औरंगाबादच्या कीर्तनकार महाराजाच्या ‘पॉर्न फिल्म’ने खळबळ; व्हिडीओची राज्यात चर्चा
राज्यात सध्या चर्चा आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील एका कीर्तनकाराच्या पॉर्न व्हिडीओची. औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका कीर्तनकाराची ‘पॉर्न क्लिप’ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे कीर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून, शरीरसंबंध वेळचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल् व्हिडीओतील या महाराजांना जिल्ह्यात प्रतिष्ठीत कीर्तनकार म्हणून […]
ADVERTISEMENT
राज्यात सध्या चर्चा आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील एका कीर्तनकाराच्या पॉर्न व्हिडीओची. औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका कीर्तनकाराची ‘पॉर्न क्लिप’ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे कीर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून, शरीरसंबंध वेळचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
ADVERTISEMENT
व्हायरल झालेल् व्हिडीओतील या महाराजांना जिल्ह्यात प्रतिष्ठीत कीर्तनकार म्हणून ओळखले जातं. या व्हिडीओनंतर इतर वारकरी संप्रदाय संघटनांकडून या महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
गेली अनेक वर्षे औरंगाबाद आणि जिल्हाबाहेर एक प्रतिष्ठेत कीर्तनकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका महाराजांचा महिलेसोबत ‘शरीरसंबंध’ ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हे वाचलं का?
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे महाराज आणि व्हिडीओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. तर दोघांचे यू-ट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला आहे.
कीर्तनकार महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे हभप ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडीओमध्ये असलेल्या कीर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, “व्हिडीओमधील दोघेही ‘आनंद संप्रदायिक’ असून, त्याच विचारसरणीला मानणारी तथा समाजामध्ये कीर्तनकार म्हणून ख्याती मिळवलेली आहे. आपल्या कीर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. आनंद संप्रदायिक असूनही बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानतात आणि आपापल्या परिसरात त्यांच्या कीर्तनाचंही आयोजन करतात. मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रद्धाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला आहे. महाराष्ट्रातील लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तणुकीने अश्लील प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी.”
ADVERTISEMENT
व्हिडीओ सोशल मीडियावर कसा आला?
मिळालेल्या माहितीप्रमाणे महाराजांची कीर्तने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. यू-ट्यूबवरही त्यांचे लाखो लोकं कीर्तन पाहतात. त्यांच्या कीर्तनाचं आयोजन गावकऱ्यांकडून नेहमीच केलं जातं. दरम्यान, सदर महाराजांचे कीर्तन ठेवण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्याचबरोबर ग्रामस्थांना दाखवण्यासाठी यापूर्वीच्या कीर्तनाचे व्हिडिओ पाठवावेत, असं सांगितलं होतं. त्यानंतर महाराजांकडून कीर्तनाचे व्हिडीओ पाठवताना शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओही पाठवले गेले आणि सोशल मीडियातून राज्यभर पसरले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT