Maharashtra Weather: कोकणात पावसासाठी पोषक वातावरण, येलो अलर्टही... जाणून घ्या आजचं हवामान

Maharashtra Weather Today: भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यातील विविध भागांसाठी 11 ऑगस्ट रोजी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे.

maharashtra weather (grok)
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

11 ऑगस्ट रोजी हवामानाचा अंदाज

point

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण

point

काय सांगतंय हवामान खातं?

Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यातील विविध भागांसाठी 11 ऑगस्ट रोजी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागानुसार, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने 23 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा : बायकोला जेवणावरून अन् कपड्यावरून बोलणं म्हणजे छळ नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

कोकण :

कोकण भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची अपेक्षित आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून अधूनमधून मुसळधार सरी पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि पालघरच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाची शक्यता वर्तवली आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला. हवामान खात्याने या भागांसाठी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्र :

कोकणानंतर राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण आणि जोरदार सरींची अपेक्षा आहे, अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.

विदर्भ :

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ: या भागात वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील. अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम: या जिल्ह्यांमध्ये पावसाने तुलनेने विश्रांती घेतली असून, हलक्या सरी किंवा कोरड्या वातावरणाची शक्यता आहे.

हे ही वाचा : "तुला स्वयंपाक येत नाही चल घरून 20 लाख घेऊन ये..." पुण्यात हुंड्यासाठी छळ अन् अखेर पीडितेनं...

उत्तर महाराष्ट्र :

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव: या भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अहमदनगरच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे

हे वाचलं का?

    follow whatsapp