पूजाचे शिवा अन् सुमित दोघांसोबतही होते अनैतिक संबंध..अश्लील व्हिडीओ बनवल्यानंतर घडलं मोठं कांड! पोलिसांनाही बसला हादरा
उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एका प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून पहिल्या प्रियकराचा खून केला. पोलिसांनी या धक्कादायक घटनेचा खुलासा केला अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

बातम्या हायलाइट

पूजाने सुमितसोबत केलं मोठं कांड

सुमितचा मृतदेह सापडला अन्..

पोलिसांनी केला खळबळजनक खुलासा
Love Affaire Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एका प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून पहिल्या प्रियकराचा खून केला. पोलिसांनी या धक्कादायक घटनेचा खुलासा केला अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी प्रेयसीला आणि आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
पूजाने सुमितसोबत केलं मोठं कांड
कानपूरच्या रावतपूरमध्ये राहणारा सुमित रविवारच्या रात्री अचानक घरातून बेपत्ता झाला. सुमितचं शेजारीच राहणाऱ्या पूजा नावाच्या तरुणीसोबत अफेअर सुरु होतं. कुटुंबियांना वाटलं की, सुमित पूजालाच भेटण्यासाठी गेला आहे. पण तो घरी परतलाच नाही. उशिरा रात्री कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला. त्यानंतर कुटुंबियांना पूजावर संशय आला. पूजाचे वडील दोन दिवसांपूर्वीच सुमितच्या घरी आले होते आणि त्यांनी कुटुंबियांना धमकावलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, सुमित त्यांच्या मुलीला त्रास देत आहे आणि जबरदस्ती तिच्यासोबत लग्न करत आहे.
सुमितचा मृतदेह सापडला अन्..
पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. असं असताना बुधवारी सोसायटीतील रिकाम्या फ्लॅटमध्ये सुमितचा मृतदेह आढळला. सुमितला फोन करण्याआधी पूजाने शिवा नावाच्या तरुणाला 39 वेळा फोन केला होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. पीडित कुटुंब पूजावर संशय घेत होते. पण पूजाने आरोपांचं खंडन करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा >> "तुला स्वयंपाक येत नाही चल घरून 20 लाख घेऊन ये..." पुण्यात हुंड्यासाठी छळ अन् अखेर पीडितेनं...
पोलिसांनी केला खळबळजनक खुलासा
पोलिसांनी तपासादरम्यान पूजाचा फोन रेकॉर्ड तपासला. पूजानेच सुमितला बोलावलं होतं. सुमितला फोन करण्याआधी पूजाने शिवा नावाच्या मुलाला 39 वेळा फोन केला होता. तपासात उघडकीस आलंय की, पूजा, सुमित आणि शिवा एकाच कंपनीत काम करतात. त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि सुमितला ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे कसून तपास केला.
एडीसीपी कपिल देव सिंह यांच्या माहितीनुसार, पूजा आणि सुमितचे प्रेमसंबंध होते. सुमितने पूजाचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर पूजाने शिवासोबत संबंध सुरु केले. पण सुमितने पूजासोबत जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला. लग्नासाठी तो पूजावर दबावही टाकत होता. त्यानंतर पूजाने शिवासोबत मिळून सुमितची हत्या केली.