जाणून घ्या सोनाली कुलकर्णीच्या नवऱ्याविषयी…

मुंबई तक

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मंगळवारी विवाहबंधनात अडकली आहे. सोनाली तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी कुणाल बेनोडेकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सोनालीचा साखरपुडा झाला होता. तर काल दुबईमध्येच कुणाल आणि सोनालीचं लग्न झालं आहे. View this post on Instagram A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं आहे. कुणालची ‘केनो’ या नावानेही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मंगळवारी विवाहबंधनात अडकली आहे. सोनाली तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी कुणाल बेनोडेकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सोनालीचा साखरपुडा झाला होता. तर काल दुबईमध्येच कुणाल आणि सोनालीचं लग्न झालं आहे.

सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं आहे. कुणालची ‘केनो’ या नावानेही ओळख आहे. कुणाल हा लंडनचा असून तो कामाच्या निमित्ताने दुबईमध्ये असतो. कुणाल हा सीए आहे.

दुबईमध्ये मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक मधील भागात कुणाल काम करतो. कुणालने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अन्ड सोशल सायन्स मधून उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यापूर्वी लंडन मध्येच त्याने मर्चंट्स टेलर स्कूल येथून BSC शिक्षण पूर्ण केलं होतं.

सोनाली आणि कुणाल हे दोघं एकमेकांना लंडनमध्ये भेटले होते. सोनाली आणि कुणाल काही ओळखीच्या नातेवाईकांमार्फत एकमेकांना भेटले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात राहिले. कुणाल सोनालीला भेटायला भारतातही आला होतातर सोनालीही कुणालला भेटायला दुबईला गेलेली. त्यानंतर अनेक वेळा या दोघांच्या गाठीभेटी झाल्या. अखेर दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp