कोल्हापूर: आयुर्वेद पंचकर्म मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, महिलेला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापूर मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये आयुर्वेदिक मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवणाऱ्यांचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

ADVERTISEMENT

दृष्टी आयुर्वेद पंचकर्म व बॉडी मसाज सेंटर या नावाखाली महालक्ष्मी चेंबर्सच्या दुसऱ्या मजल्यावर चित्रकला कुरणे ही महिला मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा व्यवसाय चालवत होती.

दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी इथं सेक्स रॅकेट सुरु असल्याचं उघड झालं. यावेळी पोलिसांनी तीन महिला युवतींची या ठिकाणांहून सुटका केली. तसेच पोलिसांनी चित्रकला कुरणे या महिलेला देखील अटक केली आहे.

हे वाचलं का?

अनेक दिवसांपासून या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा धंदा या ठिकाणी सुरू होता. शाहूपुरी पोलीसांनी पीडित तीन मुलींची सुटका केली आहे. आता या प्रकरणी आरोपी महिलेची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

पत्नींची अदलाबदली करुन उच्चभ्रू चालवत होते सेक्स रॅकेट

ADVERTISEMENT

केरळमध्ये पत्नींच्या अदलाबदलीचं एक मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आलं आहे. यासाठी WhatsApp आणि Messenger वर ग्रुपही तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये सुमारे एक हजार लोकांना अॅड करण्यात आलं होतं. Husband Wife Exchange Racket मध्ये सामील असलेल्या एकूण 7 जणांना पोलिसांनी केरळच्या कोट्टायम (Kottayam) येथून अटक केली आहे. तसेच 25 हून अधिक लोकांवर पोलिसांचं लक्ष आहे.

ADVERTISEMENT

एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी पतीविरुद्ध देण्यात आलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, तो तिला इतर पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. यापूर्वी कायमकुलम येथूनही अशीच एक घटना समोर आली होती.

कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेलमधून तीन मुलींची सुटका

या प्रकरणी चांगनचेरीचे डेप्युटी एसपी आर श्रीकुमार म्हणाले- “आधी ते टेलीग्राम (Telegram) आणि मेसेंजर (Messenger) ग्रुपमध्ये सामील व्हायचे आणि नंतर एकमेकांना भेटायचे. आम्ही तक्रारदार महिलेच्या पतीला अटक केली आहे. यामागे एक मोठे रॅकेट आहे आणि आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रिपोर्टनुसार, कोट्टायम येथील एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली की, तिचा पती तिला दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि मित्रांना अटक केली. या अटकेनंतर पोलिसांना ‘एक्सचेंज रॅकेट’ची माहिती मिळाली.

केरळ पती पत्नी एक्सचेंज रॅकेटमध्ये हजाराहून अधिक लोक सामील आहेत, ज्यामध्ये शारीरिक संबंधांसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण केली जात असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट टेलिग्राम आणि इतर ऑनलाइन मेसेंजर अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून चालते. सध्या तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT