स्तनदा मातांना लस घेता येणार , मुंबईच्या मातांना थेट लस घेता येणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तकः स्तनदा आणि गरोदर मातांना लसीकरणाबाबत अनेक प्रश्न होते. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यापैकी स्तनदा मातांना लस घेता येणार असल्याचे जाहीर केले आहे. पण, मुंबई महापालिका हद्दीत राहणाऱ्या स्तनदा मातांना थेट सेंटरवर जाऊन लस घेता येणार आहे.

ADVERTISEMENT

केंद्रिय आरोग्य खात्याने याबाबत पत्रक काढलं आहे. ज्यात दिलेल्या माहितीनुसार आता स्तनदा मातांनाही कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी मिळाली आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतील सरकारी आणि महानगपालिका लसीकरण केंद्रावर ही ‘वॉक इन’ सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते बुधवार ‘वॉक इन’ लसीकरण करण्यात येणाऱ्यांमध्ये आता स्तनदा मातांचाही समावेश करण्यात आला आहे. ज्यानुसार प्रत्येक आठवड्यातल्या पहिल्या तीन दिवसात स्तनदा मातांना लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी केल्यानंतर लस मिळू शकेल.

गरोदर स्त्रियांसाठी काय आहे नियम

हे वाचलं का?

मुंबई महानगरपालिके हद्दीतील गरोदर मातांना लस घ्यायची असेल तर त्यांना त्यांच्या स्त्री रोग तज्ञाकडून डॉक्टरांच्या लेटर हेडवर लेखी प्रमाणपत्र आणावे लागणार आहे. त्याबरोबरच गरोदर स्त्रिला तिचे स्वतःचे संमती पत्र त्याबरोबर जोडावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना लस देण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये 30 लाख 58 हजार 738 जणांच लसीकरण झालं आहे. त्यापैकी 21,96,312 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 8 लाख 62 हजार 426 जणांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. राज्यात 2 कोटी 10 लाख 48 हजार 169 जणांचं लसीकरण झालं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT