दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची तब्येत बिघडलेली होती. ज्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू आज सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली आहे. ३० जुनपासून दिलीप […]
ADVERTISEMENT

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची तब्येत बिघडलेली होती. ज्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू आज सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली आहे.
३० जुनपासून दिलीप कुमार यांच्यावर हिंदुजा रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या पत्नी सायरा बानू या काळात त्यांच्या सोबत राहून तब्येतीविषयीच्या सर्व अपडेट्स त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत होत्या. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
कोण होते दिलीप कुमार, जाणून घेऊया त्यांचा थोडक्यात परिचय –
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ अशा शब्दांत गौरवल्या गेलेले तसेच ट्रॅजिडी किंग म्हणून रसिकमान्यता मिळालेले अभिजात अभिनेते दिलीपकुमार हे मूळचे पेशावरचेच. या शहरातील किस्सा ख्वानी बाजारातील मोहल्ला खुदादाद येथील निवासस्थानी 11 डिसेंबर 1922 रोजी दिलीपकुमार यांचा जन्म झाला.