माझ्या जिवाला काही झालं तर तुम्ही जबाबदार ! नवनीत राणांचा आणखी एक लेटरबॉम्ब

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमाच चालीसेचं पठन करण्याची भूमिका घेतल्यामुळे चर्चेत आलेल्या नवनीत आणि रवी राणा या खासदार-आमदार दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. राणा दाम्पत्याने आपल्या जामिनासाठी अर्ज केला असून त्याच्यावर आज सुनावणी अपेक्षित आहे. अशातच नवनीत राणा यांनी भायखळा कारागृहात आपल्या तब्येतीची काळजी योग्य पद्धतीने घेतली जात नसल्याचं सांगत एक पत्र लिहीलं आहे. या पत्रात माझ्या जिवाला काही झालं तर त्याची जबाबदारी जेल अधिकाऱ्यांची असेल असंही राणा यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

नवनीत राणा यांना स्पॉन्डलायसिसचा आजार आहे. मुंबई कोर्टाने राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना जेलमध्ये जमिनीवरच बसावं आणि झोपावं लागत आहे. ज्या कारणामुळे नवनीत यांचं स्पॉन्डलायसीसचं दुखणं पुन्हा उफाळून आलं आहे. यासाठी २७ एप्रिलला नवनीत यांची जे.जे.वैद्यकीय रुग्णालयात चाचणी करण्यात आली. राणा यांची वैद्यकीय तपासणी झाली असता डॉक्टरांनी त्यांना सी.टी.स्कॅन चाचणी करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. परंतू जेल अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या या सल्ल्याचं पालन केलं नसल्याचं नवनीत राणांनी पत्रात म्हटलं आहे.

Hanuman Chalisa Row : “तुरुंगातील जेवण इतकं वाईट आहे का की, तुम्हाला घरचं जेवण हवंय?”; राणांना न्यायालयाचा सवाल

हे वाचलं का?

नवनीत राणा यांना जेल अधिकाऱ्यांना आपली सी.टी.स्कॅन चाचणी करावी अशी विनंती केली असतानाही ती सुविधा उपलब्ध नसल्याचं कारण देत जेल अधिकाऱ्यांनी राणा यांना नकार दिला. ज्यानंतर नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांच्या कार्यालयाने भायखळा जेल अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून त्याची एक प्रत महाराष्ट्राचे अतिरीक्त पोलीस महासंचालक आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवली आहे.

काय म्हटलं आहे त्या पत्रात? जाणून घ्या…

ADVERTISEMENT

माझ्या क्लाएंट नवनीत राणा यांची सी.टी.स्कॅन चाचणी करणं गरजेचं असतानाही तुम्ही ती चाचणी करायला नकार दिलात. त्यामुळे माझ्या क्लाएंटच्या तब्येतील काही झालं तर त्याची जबाबदारी तुमची असेल. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन करुन माझ्या क्लाएंटला लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्या.

ADVERTISEMENT

अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याची सुटका व्हावी यासाठी अमरावतीत युवा स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करत असून आज कोर्ट याचिकेवर काय सुनावणी करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT