लाइव्ह

Lok Sabha Election 2024 : ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलप, संजय पवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

babanrao gholap join eknath shinde shivsena
babanrao gholap join eknath shinde shivsena
social share
google news

Marathi News LIVE Updates : महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याकडून यांनी नारायण राणेंना डिवचण्याचा प्रयत्न करत टीका केली आहे. केंद्रीय मंत्री असून  नारायण राणेंची उमेदवारी जाहिर होत नाही, याशिवाय दुसरे अवमुल्यन ते काय? असं ते म्हणाले. आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा रत्नागिरीत सभांचा धडाका. रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीची उमेदवारी जाहीर होत नसल्याने विनायक राऊत यांच्याकडून याच मुद्यावर टीका.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 09:32 PM • 06 Apr 2024

    ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलप, संजय पवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

    शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. बबनराव घोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
     

  • 07:22 PM • 06 Apr 2024

    महायुतीत पाच जागांचा तिढा, संजय शिरसाट काय म्हणाले?

    महायुतीत जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि महत्वाच्या पाच जागांबाबत आम्ही आग्रही आहोत. आज, उद्या जागावाटपाचा तिढा सूटेल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी वक्त केला. 

  • 04:46 PM • 06 Apr 2024

    एकनाथ खडसे भाजपमध्ये करणार प्रवेश?

    शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळपर्यंत खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • 04:33 PM • 06 Apr 2024

    मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द!

    वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. 

    बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

  • ADVERTISEMENT

  • 03:32 PM • 06 Apr 2024

    भिवंडीत काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही लढणार- महेंद्र घरत

    'भिवंडीची जागा न मिळाल्यास काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देतील. कपिल पाटलांना कुणाला जिंकवायचं असेल तर आम्ही लढणार आहोत. दयानंद चोरघेंनी अर्ज भरावा, काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठराव.', असं महेंद्र घरत म्हणाले.

  • 03:17 PM • 06 Apr 2024

    सांगलीत चंद्रहार पाटलांच्या प्रचार मेळाव्याला संजय राऊत हजर!

    लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ विटा येथे कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार संजय राऊत लोकसभा उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील आणि जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना गट संजय विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • ADVERTISEMENT

  • 02:06 PM • 06 Apr 2024

    नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला मराठा समाजाकडून विरोध

    नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला आहे. जर महायुतीनं भुजबळांना उमेदवारी दिली तर त्याविरोधात मराठा समाजाकडून उमेदवार दिला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

  • 12:52 PM • 06 Apr 2024

    संजय शिरसाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट

    शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यामध्ये तब्बल १ तास चर्चा झाली. आम्ही जुने मित्र आहोत त्यामुळं त्यांची भेट घेतली असंही स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं आहे.

  • 11:46 AM • 06 Apr 2024

    शिंदेंचा अपप्रचार करून गायकवाडांना जामीन मिळेल, अशा भ्रमात राहु नका- गोपाळ लांडगे

    डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अपप्रचार करून गणपत गायकवाड यांना जामीन मिळेल, अशा भ्रमात गायकवाड यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांनी राहू नये, असा इशारा देत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी युतीत घोळ घालणाऱ्या या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी गोपाळ लांडगे यांनी केली आहे.

  • 10:58 AM • 06 Apr 2024

    'कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंना मिळाली तर...', भाजप कार्यकर्त्यांचा थेट इशारा!

    आज नागपूरमधील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण मतदारसंघातील उमेदवारीसाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली आहे. अशा स्थितीत आता भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी कल्याणच्या दाव्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याणची जागा शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंना मिळाली तर भाजपचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला असून यासंबंधी एक बैठक देखील कल्याण पूर्वेत पार पडली आहे. यामुळे महायुतील हा वाद पुन्हा एकदा समोर आला असून, आता कल्याणच्या दाव्यावरुन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे. 

  • 10:34 AM • 06 Apr 2024

    कल्याण मतदारसंघातील उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली जाहीर!

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेतील उमेदवारी जाहीर केली आहे. श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा त्यांनी केली. आता महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे आणि महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

  • 10:21 AM • 06 Apr 2024

    'भाजप करता नाही तर...', नागपूरमधील भाषणात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    'भाजप देशातला एकमात्र असा पक्ष आहे ज्यात कधीच उभी फूट पडली नाही. पक्षात फूट पडली नाही त्याचे कारण म्हणजे यातले नेते स्वार्थी, आत्मकेंद्रित कधीच नव्हते. विचारांवर चालणारा पक्ष असल्याने यात कधी फूट पडली नाही. इंदिरा गांधी यांच्या माध्यमातून देशात संविधानाची पायमल्ली झाली. विकसित भारताच्या यात्रेत आपण भाजप सैनिक म्हणून काम करत आहे. या निवडणुकीमध्ये आपण भाजप करता नाही तर भारताकरिता काम करणार आहोत.' असं देवेंद्र फडणवीस नागपूरातील भाषणात म्हणाले. 

follow whatsapp

ADVERTISEMENT