Maratha Reservation : किती हा दुटप्पीपणा? उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्वाच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी आधीच्या सरकारने केलेला काय हा फुलप्रूफ असता तर आम्हाला राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आली नसती असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला. फडणवीस यांनीही आरोपांचं प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे दुटप्पी […]
ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महत्वाच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी आधीच्या सरकारने केलेला काय हा फुलप्रूफ असता तर आम्हाला राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आली नसती असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला. फडणवीस यांनीही आरोपांचं प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे दुटप्पी असल्याचं म्हटलंय.
“मराठा आरक्षणाचा कायदा बनताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचं श्रेय घेणारे आता म्हणतात की कायदा फूलप्रुफ नव्हता. किती हा दुटप्पीपणा?? मग प्रश्न हा उपस्थित होतो की भाजप सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो, सर्वोच्च न्यायालयही यावर स्थगिती देण्यास नकार देतं. नवीन सरकार आल्यानंतर कायद्याला स्थगिती मिळते आणि तो अवैधही ठरतो. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? हे सर्वांना कळतंय.”
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आम्ही मागच्या आठवड्यात जे आश्वासन मराठा समाजाला दिलं होतं ते पूर्ण करण्याची पहिली पायरी आज होती. आम्ही याबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे. राज्यापाल कोश्यारी यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आम्ही तुमचं म्हणणं हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पोहचवू असं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.