Maharashtra SSC Result 2021 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश, वर्षा गायकवाड म्हणतात..
दहावीचा निकल आज दुपारी जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतो आहे. मात्र लाखो विद्यार्थी निकाल बघत असल्याने निकालाची वेबसाईट क्रॅश झाली. ही वेबसाईट क्रॅश झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यास अडचणी येत आहेत. http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या दोन्ही वेबसाईटवर निकाल जाहीर झाला. मात्र अजूनही वेबसाईट क्रॅशच आहे. (SSC […]
ADVERTISEMENT

दहावीचा निकल आज दुपारी जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतो आहे. मात्र लाखो विद्यार्थी निकाल बघत असल्याने निकालाची वेबसाईट क्रॅश झाली. ही वेबसाईट क्रॅश झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यास अडचणी येत आहेत. http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या दोन्ही वेबसाईटवर निकाल जाहीर झाला. मात्र अजूनही वेबसाईट क्रॅशच आहे. (SSC Website Crash) बोर्डाकडून याबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र वेबसाईटचे हिट्स वाढल्याने वेबसाईट क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही वेबसाईट गेल्या दोन तासांपासून क्रॅश झाली आहे. ही वेबसाईट पूर्ववत होण्यासाठी आणखी एक ते दोन तास लागू शकतात असंही समजतं आहे. निकालच्या दोन्ही वेबसाईट्सवर युजर्स वाढल्याने वेबसाईट क्रॅश झाली, ती पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणतात..
दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे.










