शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद
11 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि लखीमपूर खेरी या ठिकाणी झालेल्या घटनेविरोधात हा बंद पुकारण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली. लखीमपूर खीरा या भागात जे घडलं ती भारतीय […]
ADVERTISEMENT
11 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि लखीमपूर खेरी या ठिकाणी झालेल्या घटनेविरोधात हा बंद पुकारण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली.
ADVERTISEMENT
लखीमपूर खीरा या भागात जे घडलं ती भारतीय राज्यघटनेची हत्या, कायद्याची पायमल्ली आणि अन्नदाता शेतकऱ्याला संपवण्यासाठी रचलेलं षडयंत्र होतं. मोदी सरकारने मनात आणलं तर राज्याराज्यात लखीमपूर सारख्या घटना घडतील. या विरोधात देशाच्या जनतेला जागं करावं म्हणून आम्ही हा बंद पुकारला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शेतकरी एकटा नाही, आम्ही त्याच्या पाठिशी आहोत याची सुरूवात महाराष्ट्रातून व्हावी म्हणून हा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये तिन्ही पक्ष सहभागी होतील. माझी यासंदर्भात राहुल गांधी यांच्याशीही चर्चा झाली असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशातल्य लखीमपूर खेरी या ठिकाणी उत्तर प्रदेशातल्या उपमुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी जमा झाल्यानंतर तिथे भाजपच्या नेत्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. एवढा मोठा संहार झाल्यानंतर आधी गुन्हा दाखल केला जात नव्हता. तो मुलगा नेपाळला पळून गेला असंही कळलं. शरद पवारांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केली. भाजप शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहा अकरा महिने होऊनही त्यांच्याशी चर्चा करत नाही. कधी त्यांना देशद्रोही ठरवलं जातं आहे, कधी त्यांना खलिस्तानी ठरवलं जातं आहे. लखीपूर घटना झाल्यानंतर भाजप हा शेतमालाचा लूट करणारा पक्ष आहे हेच समोर आलं आहे. शेतकऱ्यांचा हत्या करणारा हा पक्ष आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आम्ही मागच्या बुधवारी जी बैठक घेतली त्यामध्ये आम्ही ठरवलं की शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला बंद पुकारला पाहिजे. त्यामुळेच महाराष्ट्रातून आम्ही बंद पुकारला आहे असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
याच पत्रकार परिषदेत सचिन सावंत म्हणाले की शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडलं गेलं ती घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे हे आणखी वाईट आहे. अत्यंत विदारक अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्माण झाली आहे. लखीमपूर खेरी मध्ये घटना घडली तशीच एक घटना आसाममध्ये झाली. हाथरसमध्ये पोलिसांनी पीडित मुलीचा मृतदेह जाळण्यात आला. अनेक गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे जनतेवर, शेतकऱ्यांवर अन्याय केला गेला आहे. सत्तेच्या दंभातून शेतकऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत. त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आम्ही महाराष्ट्र बंद करणार आहोत असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT