लाइव्ह

Marathi News Live : ‘छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर’, फडणवीसांनी दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 03:12 PM • 02 Feb 2024

    भुजबळ भाजपच्या वाटेवर, दमानियांना फडणवीसांनी काय दिलं उत्तर?

    छगन भुजबळ हे सध्या त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भुजबळांविषयी वेगवेगळ्या चर्चा होत असताना ट्विट करत अंजली दमानियांनी मोठं विधान केलं. त्या म्हणाल्या की, "भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप"दमानिया यांच्या या ट्विटला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करत असतो, अंजली दमानिया नाही. अलिकडे अंजली दमानिया या सुप्रिया सुळे यांच्या जास्त जवळच्या झालेल्या आहेत; त्यामुळे त्या असे ट्विट करत असाव्या. छगन भुजबळ हे त्यांच्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षात आहोत", असे फडणवीस म्हणाले.
  • 11:35 AM • 02 Feb 2024

    हा तुमचा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? रोहित पवारांचा शेलारांनी सवाल

    मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यातील भाषणावर टीका केली होती. ते म्हणाले होते, "अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच. रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच. वा! आम्ही सकाळीच म्हटले होते, रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार. आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का? त्याचीही एकदा चौकशी करुन.. बघून या", अशी टीका केली होती.
  • 09:29 AM • 02 Feb 2024

    कुठे फेडाल हे पाप, अंजली दमानियांचा भुजबळांवरून भाजपला संतप्त सवाल

    मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास छगन भुजबळ कडाडून विरोध करत आहेत. भुजबळ यांच्या भूमिकेमुळे सत्तेतील दोन पक्षांतील नेतेही एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहे. अशात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपवर निशाण साधला आहे.
  • 09:19 AM • 02 Feb 2024

    मविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर येणार

    महाविकास आघाडीची लोकसभा जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत त्या ८ ते १० मतदारसंघावर चर्चा होऊ शकते, ज्यांच्यामुळे जागा वाटप रखडलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यानंतरची ही पहिली बैठक असून, या बैठकीला प्रकाश आंबेडकरही असणार आहे. त्यामुळे जागा वाटपावर एकमत होणार की दिल्लीतच तोडगा निघणार, हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT