पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सगळ्या राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा, महाराष्ट्राने काय केल्या मागण्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच देशातल्या सगळ्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्राने काही महत्त्वाच्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या आहेत. त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

लसीकरणाबाबत जो काही राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे त्यामध्ये कोव्हॅक्सिनचे 40 लाख आणि कोव्हिशिल्डचे 50 लाख डोस मागितल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. 15 ते 18 या वर्षातील वयोगटातील मुलाचं लसीकरण करण्यासाठी वृद्ध व्यक्तींना बूस्टर डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिन ही लस कमी पडते आहे त्यामुळे केंद्राकडे वाढीव लस पुरवठ्याची मागणी केली आहे. अनेक लोक लसीकरण करून घेत नाहीये त्याबाबत केंद्राकडून काही नियमावली करता येईल का अशी विचारणाही केल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रणावर लक्ष केंद्रित करा. तसेच अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. कोरोना काळात अर्थव्यवस्था कोलमडणार नाही याकडे लक्ष केंद्रीत करा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना केली आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या राज्यातील कोरोना स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच लॉकडाऊन लागणार लागणार नाही, याची काळजीही घ्या असा सल्ला दिलाय.

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अतिशय वेगाने लसीकरण सुरु आहे. लसीकरण वेगाने होत असतानाही कोरोनाचा संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाही, त्यामुळे काही जणांकडून लसीकरणाबाबत भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मास्कबाबतही अशाच अफवा उठतात. अशा अफवांना उत्तर देण्याची खूप गरज आहे. अशाप्रकारचे प्रयत्न हाणून पाडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केलं आहे. तसेच राज्यातील कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचनाही पंतप्रधानांनी राज्यांना केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘केंद्राने राज्यांना 23 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा वापर करुन अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटं लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात.’

ADVERTISEMENT

पंतप्रधानांना लक्षात आणून दिलं की, चार हजार नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग केली तेव्हा तेराशे नमुने ओमिक्रॉनचे आढळले, तर 2 हजार 700 नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यांमुळे डेल्टा आजही प्रभावी असल्याचं निदर्शनास आलं आहे. अडीच लाख केसेसमध्ये 70 टक्के डेल्टा आणि 30 टक्के ओमिक्रॉन आहे. त्यामुळे ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत अत्यंत सुस्पष्टता असावी ती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT