LockDown New Rules : किराणा दुकानं, डेअरी, फळं, भाजीपाला विक्री सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात ब्रेक द चेनचे नवे निर्बंध लागू करून बरोबर सात दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही रूग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात नवे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. आजच सरकारने यासंदर्भातली घोषणा केली आहे. 20 एप्रिल म्हणजेच आजपासून रात्री 8 वाजल्यापासून 1 मेच्या सकाळी 7 पर्यंत हे नवे नियम असणार आहेत. हे नवे नियम काय आहेत आपण जाणून घेऊयात.

काय आहेत नवे निर्बंध?

किराणा मालाची दुकानं, भाजीपाला विक्री, फळ विक्री, डेअरी, बेकरी, खाद्य पदार्थ विकणारी सगळी दुकानं ज्यामध्ये मटण, चिकन, अंडी, मासे विक्री केंद्राचाही समावेश आहे तसंच कृषीशी संबंधित दुकानं, पाळीव प्राण्यांचं खाद्य मिळणारी दुकानं ही सगळी दुकानं सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच खुली राहणार आहेत. यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय इतरही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सगळ्या दुकांनाना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. मात्र कोरोनाची स्थिती पाहून त्यासंदर्भातला निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेतील असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे

आपत्कालीन व्यवस्था विभागाला या नियमांमध्ये आणखी काही नियमांची भर घालायची असेल तर ते घालू शकतात अशीही बाब या आदेशात नमूद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

या आधी 13 एप्रिलला जो आदेश काढण्यात आला होता त्यातले सर्व नियमही तसेच लागू असतील त्यापैकी कोणत्याही नियमांना शिथीलता देण्यात आलेली नाही

ADVERTISEMENT

दारूची दुकानं पूर्णतः बंद करण्यात आली आहे

रिक्षा, टॅक्सी सेवा फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच उपलब्ध होणार

‘BIG News 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार’

मेडिकल सेवा पूर्ण वेळ सुरू राहणार आहे त्या वेळेवर काहीही निर्बंध नाहीत.

कोरोनाचा संसर्ग काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रात दररोज 60 ते 66 हजार या दरम्या लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत. कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठीच निर्बंध कठोर कऱण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात 1 मेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आलेला आहेच. 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून हे निर्बंध लावण्यात आले आहेत मात्र तरीही कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT