WTC Final: काहीही अशक्य नाही.. द. आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा केला पराभव, मिळवलं कसोटीचं जगज्जेतेपद!
Australia vs South Africa, WTC Final 2025: जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा यशस्वी पाठलाग करत आफ्रिकेने कसोटीचं जेतेपद मिळवलं.
ADVERTISEMENT

लंडन: आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) च्या तिसऱ्या फेरीच्या (2023-25) अंतिम (Final) सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अत्यंत ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. तब्बल 27 वर्षानंतर द. आफ्रिकेने दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे.
आज (14 जून) लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी द. आफ्रिकेने 5 विकेट बाकी ठेवून ऑस्ट्रेलियावर दणदणीत असा विजय मिळवला.
27 वर्षांनी द. आफ्रिकेने पटकावली ICC ट्रॉफी
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सुमारे 282 धावांचा यशस्वी पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेने 1998 मध्ये त्यांचे एकमेव आयसीसी जेतेपद जिंकले होते. ज्यानंतर तब्बल 27 वर्षांनी त्यांना हा इतिहास रचला.
हे ही वाचा>> शुभमन गिलच्या कर्णधारपदानंतर... रवींद्र जडेजा म्हणाला, मला व्हायचंय...
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 212 आणि दुसऱ्या डावात 207 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 138 धावांमध्येच आटोपला होता. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 74 धावांची आघाडी मिळाली होती.










