Govt Job: Insurance सेक्टरमध्ये सरकारी नोकरी! 'या' पदांसाठी मोठी भरती... कसा कराल अर्ज?
नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (NICL) जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट (कॅडर-1) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंपनी देशभरातील पात्र तरुणांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

NICL कडून मोठ्या पदांसाठी भरती

पदवीधर असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी

NICL मध्ये अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया?
Govt Job: पदवीधर असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (NICL) जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट (कॅडर-1) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंपनी देशभरातील पात्र तरुणांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 12 जून 2025 पासून सुरू होणार आहे. यासाठी पात्र उमेदवार 3 जुलै 2025 पर्यंत nationalinsurance.nic.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातूनच स्विकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्यूएशन (पदवी), पोस्ट ग्रॅज्यूएशन(पदव्युत्तर पदवी), B.E, B.Tech, M.E, M.Tech, B.Com, M.Com, C.A, Law (कायदा), M.B.B.S (एमबीबीएस), M.S(एमएस) किंवा P.G (पीजी) पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 वर्षेआणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमांनुसार राखीव श्रेणींना वयात सूट दिली जाईल. वयाची गणना 1 मे 2025 च्या आधारे केली जाईल.
हे ही वाचा: दुप्पट वयाच्या पतीसोबत नव्हते ठेवायचे शारीरिक संबंध फक्त हवी होती 'ही' गोष्ट.. सांगलीतील पतीच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात: 12 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 जुलै 2025
- अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025
- फेज 1 परीक्षा (संभाव्य तारीख): 20 जुलै 2025
- फेज 2 परीक्षा (संभाव्य तारीख): 31 ऑगस्ट 2025
अर्जाचे शुल्क
अर्ज करणाऱ्या जनरल (Open), ओबीसी (OBC), ईडब्ल्यूएस(EWS) उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी (SC)/एसटी (ST) /पीडब्ल्यूडी (PWD) साठी 250 रुपये शुल्क आकारण्यात येईल.
हे ही वाचा: वासनांध तरूण महिलेसोबत नको ते करायला गेला, महिलेने तरुणाचं गुप्तांगच कापलं!
कसा कराल अर्ज?
1. सर्वप्रथम nationalinsurance.nic.co.in या NICL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. त्यानंतर होमपेजवरील 'recruitment' सेक्शनमध्ये जा.
3. आता भरतीच्या संबंधित लिंकवर क्लिक करा आणि 'New Registration' मध्ये जाऊन रजिस्टर करा.
4. यानंतर आवश्यक डिटेल्स भरून फोटो आणि सही अपलोड करा.
5. प्रवर्गानुसार अर्जाचं शुल्क भरुन अर्ज सबमिट करा.
6. शेवटी फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याकडे सुरक्षितरित्या ठेवा.