Maharashtra Weather: कोकणात पावसाचा जोर कायम, पुणे आणि कोल्हापूरातील 'या' भागात पाणी साचणार! पाहा आजचं हवामान
Maharashtra Weather Update : राज्यात 14 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) तसेच इतर विश्वसनीय स्त्रोतांवर आधारित माहितीचा समावेश आहे. 14 जून रोजी दक्षिण-पश्चिम मान्सूनचा कालावधी असून ही परिस्थिती राज्यात सामान्यत: जूनच्या सुरुवातीला दिसून येते. 2025 च्या मे महिन्याच्या मान्सून अंतिम 12 दिवसांआधी महाराष्ट्रात दाखल झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात 14 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज जारी केला
पुणे आणि कोल्हापूरात पावसामुळे रस्त्यावरील सखल भागात पाणी साचणार
Maharashtra Weather Update : राज्यात 14 जून रोजी हवामान खात्याने पावसाचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) तसेच इतर विश्वसनीय स्त्रोतांवर आधारित माहितीचा समावेश आहे. 14 जून रोजी दक्षिण-पश्चिम मान्सूनचा कालावधी असून ही परिस्थिती राज्यात सामान्यत: जूनच्या सुरुवातीला दिसून येते. 2025 च्या मे महिन्याच्या अंतिम 12 दिवसांआधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. जून महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सूनचा संपूर्ण राज्यात चांगला प्रभाव असणार आहे, तसेच मान्सूनसाठी सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा: 1206 लकी नंबर ठरला अनलकी, 12-06 ही तारीख माजी मुख्यमंत्र्यांचा ठरला अखेरचा दिवस
कोकण भागातील मान्सूनस्थिती
कोकण भागात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असून वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीत समद्रकिनारी भागात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पाणी साचण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदारी सरी कोसळणार आहेत. तसेच सोलपूरात काही भागात पाऊस पडणार आहे. दरम्यान, पुणे आणि कोल्हापूरात पावसामुळे रस्त्यावरील सखल भागात पाणी साचणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नका असे आवाहन केलं आहे.
मराठवाड्यात ढगाळ वातावरण
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस धिंगाणा घालणार आहे. तर ढगाळ वातावरण तयार झाल्याने उष्णता जाणवू लागेल.










