Air India Crash : 'त्या' महिलेचं सिंदूर पुसलं! घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न..
वडोदरा मध्ये राहणाऱ्या भाविक माहेश्वरी नावाच्या व्यक्तीचा त्याच्या लग्नाच्या फक्त दोन दिवसांनंतरच अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अहमदाबादमधील विमान अपघातात वडोदरामधील व्यक्तीचा मृत्यू
लग्नाच्या केवळ 2 दिवसांनंतर भाविक माहेश्वरीचा मृत्यू
लग्नाच्या 2 दिवसांनंतरच महिलेचं सिंदूर पूसलं गेलं
Air India Plane Crash: वडोदरा शहरात वाडी शहरात राहणाऱ्या माहेश्वरी कुटुंबात दोन दिवसांपूर्वीच लग्नाचं आनंदी वातावरण होतं. या कुटुंबातील भाविक माहेश्वरीचं 10 जून रोजी कोर्ट मॅरेज झालं. मात्र, या घरात आता दु:खद वातावरण पाहायला मिळतंय. लग्नाच्या फक्त दोन दिवसांनंतरच भाविकचा अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्यू झाला.
भाविक माहेश्वरी मागीत बऱ्याच वर्षांपासून लंडनमध्ये काम करत होता. दरवर्षी ते 15 दिवसांसाठी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वडोदराला यायचा. भाविकचं आधीच लग्न ठरवण्यात आला होतं आणि कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने 10 जून रोजी त्यांचं कोर्ट मॅरेज झालं.
लग्नानंतर दोन दिवसांतंच पतीला कायमचा निरोप
लग्नानंतर वडोदराहून परत लंडनला त्याचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी त्याच्या नवविवाहित पत्नीने त्याला हसत हसत शुभेच्छा दिल्या. मात्र, आपल्या पतीला असा निरोप देण्याची ही शेवटची वेळ असेल असा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. फ्लाइटमध्ये चढल्यानंतर काही तासातंच एअर इंडियाचं विमान उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातंच क्रॅश झाल्याची बातमी समोर आली आणि याच विमानात भाविक प्रवास करत होता.
हे ही वाचा: Air India Plane Crash: रोशनी सोनघरेची इंस्टाग्रामवरची शेवटची पोस्ट अन्...
या बातमीमुळे माहेश्वरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांना भाविकच्या मृत्यूवर अजूनही विश्वास बसत नाहीये. कुटुंबियांमध्ये सर्वत्र शोककळा पसरली आहे.










