Ahmedabad Plane Crash: नावडती सीटच ठरली लकी! विश्वास कुमार वाचणं हा मोठा चमत्कारच!
अहमदाबाद विमान अपघातात विश्वास कुमार या एकाच व्यक्तीचा जीव वाचला. ते बोईंगच्या 787-8 ड्रीमलायनरच्या सीट क्रमांक 11A वर बसले होते आणि त्यांचा जीव वाचण्यासाठी ही नावडती सीटच लकी ठरली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एअर इंडियाचं विमान कोसळल्याची दु:खद घटना
विमानातील प्रवाशांपैकी एकाचाच वाचला जीव
विश्वास कुमारचा जीव वाचणं चमत्कारापेक्षा कमी नाही
Air India Crash: अहमदाबाद विमान अपघातात विश्वास कुमार नावाच्या या एकाच व्यक्तीचा जीव वाचणं, हे चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं सर्वत्र सांगितलं जात आहे. विश्वास कुमार रमेश हे अहमदाबाद ते लंडन या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 मध्ये होते. विश्वास कुमार रमेश बोईंगच्या 787-8 ड्रीमलायनरच्या सीट क्रमांक 11A वर बसले होते.
11-A क्रमांकाची सीट नावडती
सतत विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी बोईंग विमानात 11-A क्रमांकाची सीट सहसा पसंतीची नसते. युनिलाडटेक या फ्लाइट संबंधित समस्यांबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाइटच्या मते, ही सीट साधारण खिडकीजवळ नसल्यामुळे अनेकांसाठी नावडती ठरते; या सीटजवळ एक लहान गोलाकार खिडकी असते, ज्यातून तुम्ही बाहेर क्वचितच पाहू शकता.
बोईंगच्या 737-800 विमानात परिस्थिती आणखी वाईट असते. एअर कंडिशनिंग सिस्टिममुळे या सीटला खिडकी नसते. तसेच सीटच्या बाजूला असलेल्या डक्टमुळे खिडकीची जागा अडवली जाते.
याव्यतिरिक्त काही विमानांमध्ये 11 A सीट विमानाच्या मध्यभागी असल्यामुळे जेवण देण्यास आणि सामान उतरवण्यासाठी वेळ जातो. तसेच, पंखांच्या वरच्या जागेमुळे इंजिनचा आवाजही जास्त आणि पायांसाठी जागा कमी होऊ शकते.










