सीमावाद: ’24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’, शरद पवार संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Karnataka Border Dispute: मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा पुन्हा एकदा पेटला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. ज्यामुळे सीमा भागातील वातावरण हे खूपच चिघळलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातून (Maharashtra) कर्नाटकमध्ये (Karnataka) जाणाऱ्या वाहनांनावर सातत्याने हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या सगळ्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईतील पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला. (maharashtra karnataka border dispute there will be no patience if attacks on vehicles going from maharashtra to karnataka do not stop in 24 hours sharad pawar fumes)

ADVERTISEMENT

‘येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर महाराष्ट्राने घेतलेल्या संयमाला वेगळं वळण लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याला सर्वस्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार राहतील.’ असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमधील बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत शरद पवारांनी हा विषय गंभीर असून त्यात थेट केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन देखील केलं आहे. आता स्वत: शरद पवारांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घातल्याने राज्यातील राजकारणाला वेगळं वळण लागू शकतं.

हे वाचलं का?

कन्नड संघटनांची मागणी कर्नाटक प्रशासनाकडून मान्य; महाराष्ट्रातील नेत्यांना ‘बेळगाव बंदी’

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

ADVERTISEMENT

‘ज्या वेळेला सीमाभागत काही घडतं त्यावेळी कटाक्षाने सीमा भागातील अनेक घटक माझ्याशी संपर्क साधतात. आता माझ्याकडे जी माहिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे. आज मला तिकडून जे फोन येतायेत. त्यामध्ये… आता उदाहरणार्थ एकीकरण समितीचे पदाधिकारी त्यांचे जे मेसेज येत आहेत. त्यात कर्नाटक सरकार तेथील मराठी नागरिकांवर अन्याय करत असल्याचे अनेक मेसेज मला येत आहेत.’

ADVERTISEMENT

‘अपेक्षा ही होती की, काही तरी पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थिती निवळण्यासाठी काळजी घेणं आवश्यक होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी संपर्क साधला असं मला त्यांनी स्वत: सांगितलं आहे. चांगली गोष्ट आहे पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही.’

‘विशेषत: आज महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांवर जे हल्ले झाले त्यामुळे एक प्रकारच्या भीतीचं वातावरण या सगळ्या परिसरात झालेली आहे. हे वेळीच थांबलं नाही तर एक संयमाची भूमिका महाराष्ट्राने घेतली आहे. अजूनही घ्यायची तयारी आहे. पण त्या संयमाला सुद्धा मर्यादा असतात.’

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद काय आहे? : भाजपची सत्ता असलेली २ राज्य का आली आमनेसामने?

‘येत्या 24 तासामध्ये या वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर या संयमाला वेगळं वळण लागू शकतं. तशी परिस्थिती निर्माण झाली तर याची जबाबदारी ही कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार यांच्यावरच पूर्णपणाने राहणार आहे.’

‘महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अजूनही संयमाची आहे. त्या संयमाला मर्यादा येऊ नये अशी मनापासूनची इच्छा आहे. पण जर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चिथावणीखोर भूमिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून या प्रकारचे हल्ले जर घडत असेल तर देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धक्का आहे.’

‘हे काम जर कर्नाटकातून होत असेल तर साहजिकच केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदेचं सत्र सुरु होतंय. त्यामुळे महाराष्ट्रातील जे खासदार आहेत त्यांना विनंती करणार आहोत की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालावी.’ असं म्हणत शरद पवार हे सीमावाद प्रकरणात अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

आता शरद पवारांच्या या भूमिकेमुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT