राहुल शेवाळेंची चौकशी होणार? नीलम गोऱ्हेंचे सरकारला निर्देश; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर : हिवाळी अधिवेशनात गुरुवारी विधानसभेत वातावरण चांगलचं तापलं होतं. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजन दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची सोखल चौकशी व्हावी अशी मागणी शिंदे गट आणि भाजपमधील आमदारांकडून सातत्याने केली जात होती. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचं या प्रकरणात नाव घेण्यात आल्यानं त्यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

ADVERTISEMENT

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बुधवारी आरोप केलेल्या खासदार राहुल शेवाळे यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली. राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही हा मुद्दा आमदार मनिषा कायंदे आणि अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे सरकारला चौकशीचे निर्देश दिले.

नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, अनिल परब यांनी जो मुद्दा मांडला आणि सभापती महोदयांनी जे निर्देश दिले त्याचा सरकार निश्चितपणे त्यांचे निर्देश तपासेल आणि त्यावर योग्य कारवाई केली जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सरकारचा अभ्यास अधिवेशन संपेपर्यंत पूर्ण होईल ही अपेक्षा असल्याचं म्हणतं सभागृह शुक्रवारपर्यंत स्थगित केलं.

हे वाचलं का?

जयंत पाटील यांचं निलंबन :

सभागृहात आजच्या दिवशी सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं निलंबन. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांना बोलू द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

या मुद्द्यावर सर्व विरोधक आक्रमक झालेले असताना अध्यक्ष नार्वेकरांनी मात्र त्यास नकार दिला. या सगळ्या गोंधळात जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका” असा शब्दप्रयोग केला. सत्ताधाऱ्यांकडून याच निर्लज्ज शब्दावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. 

ADVERTISEMENT

काय घडलं सभागृहात?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT