लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : मराठा आंदोलकांनी संभाजीनगरमध्ये अमित शहांचे बॅनर फाडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Amit shah, chhatrapati sambhaji nagar, maratha protest
Amit shah, chhatrapati sambhaji nagar, maratha protest
social share
google news

Maharashtra News LIVE Updates : लोकसभा निवडणुकीच्या घडामोडी, जागावाटपाबद्दलच्या ताज्या बातम्या आणि महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, सामाजिक, गुन्हेगारीविषयक अपडेट्स वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


 

लाइव्हब्लॉग बंद

 • 07:05 PM • 04 Mar 2024

  मराठा आंदोलकांनी संभाजीनगरमध्ये अमित शाहांचे बॅनर फाडले

  देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मंगळवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.शहरातील सांस्कृतिक मंडळ येथे अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे.यानिमित्ताने केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये सभेचे बॅनर लावलेले होते. मात्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्यावरून मराठा बांधव संतप्त आहे. त्यात वैजापूर तालुक्यातील मराठा तरुणांनी भागवत कराड यांनी अमित शहा यांचे लावलेलं बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील टुणकी गावातील ही घटना आहे.

 • 06:22 PM • 04 Mar 2024

  मुंबईने गाठली रणजी ट्रॉफीची फायनल!

  मुंबईने सेमी फायनल सामन्यात तमिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या हंगामात रणजी ट्रॉफीची गाठली आहे. त्यांचा सामना आता विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे.

 • 06:20 PM • 04 Mar 2024

  'देवेंद्र फडणवीस हे आत्याची भूमिका पार पाडत पोलिसांचे कान फुकतायेत'- मनोज जरांगे

  'आता नवीन डाव आणला आहे, मुंबई चलो बोर्ड काढत आहेत. देवेंद्र फडणवीस हे आत्याची भूमिका पार पाडत पोलिसांचे कान फुंकत आहेत. कोणाचंही सरकार असो मला त्याच्याशी देणं घेणं नाही, माझा आरक्षणाशी संबंध आहे. फडवणीस आणि आमच्यामध्ये काही दुष्मनी नाही मुख्यमंत्री म्हणतात मी करेट कार्यक्रम करतो.' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

 • 04:02 PM • 04 Mar 2024

  महादेव जानकर यांनी केले मोठे विधान

  आम्ही सध्या कुठल्याही महाविकास आघाडी किंवा महायुतीत समाविष्ट नाही. काल शरद पवार यांनी माढाची जागा आम्हाला देतो अस म्हटलं होते. मात्र आमचं माढा आणि परभणी ह्या दोन जागा आम्ही हट्टास आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या बैठक आम्हाला बोलावन आलं नाही.

 • ADVERTISEMENT

 • 01:55 PM • 04 Mar 2024

  'मैं हूं मोदी का परिवार...', मोदींनी लालू प्रसाद यादवांना दिलं प्रत्युत्तर

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील आदिलाबाद येथे जाहीर सभेला संबोधित करताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार प्रहार केला. "माझ्या कुटुंबामुळे मला लक्ष्य करण्यात आले. पण, आता संपूर्ण देश म्हणतोय की मी मोदींचं कुटुंब आहे", असे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "घराणेशाही पक्षाचे चेहरे वेगवेगळे असू शकतात परंतु वर्ण एकच आहे. त्याच्या चारित्र्यामध्ये दोन खात्रीच्या गोष्टी आहेत, एक खोटे बोलणे आणि दुसरी दरोडा."

  ते पुढे म्हणाले, 'आज संपूर्ण देशात मोदींच्या हमीभावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मोदींची हमी म्हणजे मोदींची हमी पूर्ण होण्याची हमी. जणू काही TRS BRS झाल्यानंतर तेलंगणात काहीही बदलले नाही. तसेच काँग्रेसने बीआरएसची जागा घेतल्याने काहीही बदल होणार नाही. हेच लोक आहेत. ते मला उद्या सांगू शकतील की तू कधी तुरुंगात गेला नाहीस, त्यामुळे तू राजकारणात येऊ शकत नाहीस.

  पीएम मोदी पुढे म्हणाले, 'माझे जीवन हे एक खुले पुस्तक आहे. देशवासियांसाठी जगेन हे स्वप्न घेऊन मी बालपणी घर सोडले. माझा प्रत्येक क्षण फक्त तुमच्यासाठी असेल. माझे कोणतेही वैयक्तिक स्वप्न नाही. तुमचे स्वप्न माझा संकल्प होईल. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी माझे आयुष्य घालवेन. देशातील कोट्यवधी जनतेने मला आपले मानले आहे. ते मला त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानतात. १४० कोटी देशबांधवांनो, हे माझे कुटुंब आहे", असे उत्तर मोदींनी लालू प्रसाद यादव यांना दिले. 

  "हे तरुण माझे कुटुंब आहेत. देशातील करोडो मुली, माता, भगिनी हे मोदीचे कुटुंब आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती हे माझे कुटुंब आहे. मुले हे वृद्ध मोदीचे कुटुंब आहे. ज्यांना कोणीही नाही, तेही मोदीचे आणि मोदीही त्यांचेच. माझा भारत माझे कुटुंब आहे. मी तुमच्यासाठी जगतोय आणि लढतोय", असे सांगत मोदींना पलटवार केला.

 • 12:48 PM • 04 Mar 2024

  अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात सभा होणार आहे. सभेसाठी तब्बल 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.  तर सभा परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.

 • ADVERTISEMENT

 • 12:47 PM • 04 Mar 2024

  Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज उद्घाटन

  समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होणार आहे. भरवीर ते इगतपुरी या दरम्यानच्या रस्त्याचे उद्घाटन केले जाणार आहेत.

 • 11:58 AM • 04 Mar 2024

  'माझ्याकडे वाया घालवायला...', आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर!

  'तुम्ही माझ्या वरळी मतदारसंघात निवडणुकीला माझ्या विरोधात उभे राहा किंवा मी तुमच्या ठाण्यात तुमच्या विरोधात उभे राहतो,' असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उत्तर दिलं आहे. 'माझ्याकडे वाया घालवायला वेळ नाही, माझ्यासमोर मोठ्या महाराष्ट्राचे काम आहे,' अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

 • 11:36 AM • 04 Mar 2024

  नवनीत राणा यांचं नागपूरात शक्ती प्रदर्शन

  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजरो कार्यकर्त्यांसह नागपुरला जाणार आहेत. नवनीत राणा आज नागपूर येथे होणाऱ्या भाजपच्या नमो युवा संमेलनात उपस्थित राहणार आहेत. हजारो समर्थकासह नवनीत राणा नागपूर येथे भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावण्याची शक्यता आहे.  नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे

 • 09:56 AM • 04 Mar 2024

  "आता महाराष्ट्र उबाठा गटाला विचारतोय...तुमची इयत्ता कंची?"

  मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंना सुनावले आहे. काय म्हणाले शेलार वाचा ट्विट...

  "बहुरुपी आले रे.. बहुरुपी आले! 

  प्रभू श्रीराम काल्पनिक मानणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेचे वाटेकरी झाले. 

  भारत तेरे तुकडे हो हजार...म्हणणाऱ्यांचे पाठीराखे झाले

  देव न मानणाऱ्या स्टॅलिन सोबत गेले

  याकूबची कबर सजवलीच... आणि मराठी मुस्लिमांसोबत बिर्याणीच्या "पंगतीत" जाऊन बसले

  हिंदुत्वाला तिलांजली देऊन हल्ली हल्ली तर उबाठा नामक गट "समाजवादी" झाले

  मार्क्सवादी, माकपा, भाकपा सगळ्या जगभरातील विचारसरणी कवटाळून झाल्या असतील 

  तर..
  आता महाराष्ट्र उबाठा गटाला
  विचारतोय...

  नेमकी आयडालॉजीच्या बाबतीत तुमची इयत्ता कंची ? 
  आयडालॉजी तडीपार आणि रोज गळ्यात नवा हार !!

  म्हणून आम्ही महाराष्ट्राला 
  सांगतोय...!!

  सावधान.. सावधान.. सावधान
  बहुरुपी आले रे ... बहुरुपी आले!"

  असे म्हणत शेलारांनी ठाकरेंना चिमटे काढले आहेत. 

 • 09:39 AM • 04 Mar 2024

  "...तर आम्हीही तुमच्याबरोबर येतो", मोदींचं नाव घेत ठाकरेंचं काय बोलले?

  नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त पक्षातून बाहेर पडलेल्या आमदार कपिल पाटील यांनी नवी पक्ष स्थापन केला. समाजवादी गणराज्य पक्षाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली, पण त्यांच्या एका विधानाची चर्चा होतेय.

  उद्धव ठाकरे म्हणाले की, "साधारण ८ वर्षांपूर्वी मोदींनी बिहारच्या लोकांना सांगितलं होतं की, ५० हजार कोटींमुळे बिहारचं काही होणार नाही. त्यानंतर मोदी आकडा वाढवत गेले आणि असं करत करत त्यांनी सभेत बिहारसाठी सव्वा लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या गोष्टीला आठ वर्षे झाली. आता नितीश कुमारांना विचारा की सव्वा लाख कोटी बिहारला मिळाले का? बिहारच्या जनतेला जर सव्वा लाख कोटी मिळाले असतील तर आम्हीही तुमच्याबरोबर येतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 • 09:29 AM • 04 Mar 2024

  जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द 

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीमुळे नड्डा नागपूरला येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात आले. 

follow whatsapp

ADVERTISEMENT