Amit Shah : अमित शहांचा महाविकास आघाडीवर हल्ला,'ठाकरे, पवारांना...'
maharashtra live updates : लोकसभा निवडणुकीबद्दलचे सर्व घडामोंडीसह वाचा महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, गुन्हेगारीविषयक घटनांचे ताजे अपडेट्स...
ADVERTISEMENT
Lok Sabha 2024 election Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षाचे नेते दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागावाटप अजूनही निश्चित झालेले नाहीत. या सगळ्यांचे अपडेट वाचा... (Amit Shah Maharashtra Visit Live updates)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 05:37 PM • 05 Mar 2024
उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, विषय काय?
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठका झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट होत आहे.
महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांकडून वेगवेगळ्या अटी टाकल्या जात असून, याच संदर्भात उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत चर्चा करणार आहेत.
ठाकरे आणि पवार हे बुधवारी (६ मार्च) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल अंतिम चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रकाश आंबेडकरांकडून केल्या जाणाऱ्या नवनव्या मागण्या आणि जागांबद्दल ठाकरे पवारांमध्ये चर्चा होईल, असे सांगण्यात आले आहे.
- 05:29 PM • 05 Mar 2024
अमित शाहांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
महाराष्ट्रात तीन पायांची रिक्षा चालते.तिचे नाव रिक्षा आहे. या रिक्षाचे तीनही चाकं पक्चर आहेत. महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास देऊ शकते का? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राला विकास देऊ शकते.
- 05:24 PM • 05 Mar 2024
अमित शाह यांची शरद पवारांवर जोरदार टीका
पवार साहेब मोदींना 10 वर्ष झाली आहेत. 50 वर्षापासून महाराष्ट्राची जनता तुम्हाला सहन करते. 50 वर्ष सोडा 5 वर्षांचा हिशोब द्या जनतेला. मी तर 10 वर्षांचा हिशोब द्यायला आलो आहे, असे अमित शाह म्हणाले आहेत. दरम्यान नरेंद्र मोदींकडे 10 वर्षाचा हिशोब पण आहे आणि 25 वर्षाचं ह्विजन देखील आहे. असा नेता देशाला परत परत मिळत नसतो. देशाला सुरक्षित, समृद्ध करण्याच काम मोदींनी केले आहे.
- 05:17 PM • 05 Mar 2024
अमित शाह यांची काँग्रेसवर टीका
अटलजी देशाच्या अर्थव्यवस्थेला 11 व्या नंबरवर सोडून गेले होते. पण काँग्रेस 10 वर्षात 11 व्याच नंबरवर अर्थव्यवस्थेला ठेवले. मोदींनी 10 वर्षात अर्थव्यवस्थेला 11 व्या नंबरवरून 5 वर नेण्याचे काम केले. मी आज मोदींची गॅरंटी सांगायला आलो आहे. मोदींची गॅरंटी आहे, तिसरी टर्म द्या, तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था भारत बनेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
- 05:09 PM • 05 Mar 2024
अमित शहांचा महाविकास आघाडीवर हल्ला,ठाकरे, पवारांवर टीका
सोनिया गांधीला राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचं आहे. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचंय. ममता बॅनर्जीला भाच्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे. स्टॅलिनला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. यामध्ये तुमच्यासाठी काहीच नाही. तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत, असा विश्वास अमित शाह यांनी युवकांना संबोधित करताना व्यक्त केला.
- 03:50 PM • 05 Mar 2024
"रोज गळ्यात नवा हार ,आयडालॉजी तडीपार"
मुंबई भाजपने एक फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र आहे. ज्यात त्यांच्या गळ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शेकाप, डावे पक्षाचे हार दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना "रोज गळ्यात नवा हार ,आयडालॉजी तडीपार", अशा शब्दात भाजपने निशाणा साधला.
- 02:16 PM • 05 Mar 2024
''अब की बार भाजपा तडीपार'', उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल
''अब की बार भाजपा तडीपार'' असा नारा पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. भाजपला तडीपार केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. तडीपारीची नोटीस काल दिली आहे,आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्हाला करायचा आहे, असे आवाहन ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे.
शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. जालिंदर सरोदे यांच्यासह शिक्षक भारतीचे काही शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना जालिंदर सरोदे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता.
आपल्या सगळ्यांचे शिवसेनेत स्वागत आहे. शिक्षक बोलल्यानंतर विद्यार्थी ऐकणार नाही, असे होऊच शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला हातात छडी सुद्धा घ्यावी लागेल. पण सध्या जे राजकारणार चाललंय त्यांना सुसंस्कृतपणाचा धडा देण्याची आवश्यकता आहे.
तुम्ही अत्यंत वेळेवरती शिवसेनेते येण्याचा निर्णय घेतला. जालिंदर सर तुम्ही शिक्षक सेना पुरतेच काम नाही तर शिवसेना मध्ये सुद्धा काम करणार आहात, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. आज तुम्ही सत्ता आणण्यासाठी माझ्या सोबत आला आहेत. सुजाण राज्य करण्यासाठी तुमचा उपयोग करायचा आहे, असे ठाकरे म्हणाले.
शिक्षक मतदारसंघामध्ये माझं दुर्लक्ष झालं होतं. निवडणुकीत अभ्यंकर विजयी झाले म्हणजे झालं नाही तर तुमचे विषय मार्गी लागले पाहिजे. शिक्षकांनी शिक्षकांच काम केलं पाहिजे, दुसऱ्या ड्युटी लावता कामा नये. आता मी लढेन आणि जिंकल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी माझी असेल, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
- 01:40 PM • 05 Mar 2024
राजन साळवींच्या पत्नीला का रडू कोसळलं?
रत्नागिरीतील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी (ACB) म्हणजे लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणार आहे. सोमवारी राजन साळवी यांची पत्नी, मुलगा आणि भाऊ यांची चौकशी झाली. राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची सोमवारी चौकशी झाल्यानंतर एसीबी कार्यालयातील आरोपींसाठीच्या रजिस्टरवर त्यांना सही करण्यास सांगितलं गेलं. 'एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून माझी चौकशी झाली. मी त्यांना लागणारी सर्व कागदपत्रंही दिली. चौकशी पूर्ण झाली असली तरी 8 मार्चपर्यंत दररोज आम्हाला एसीबीच्या कार्यालयात यावंच लागणार आहे.' आरोपीच्या रजिस्टरमध्ये सही करावी लागल्यामुळे राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवींना रडू कोसळलं.
- 01:22 PM • 05 Mar 2024
मोदीजींचा अपमान करतात, यांना तुरुंगात पाठवा; संजय राऊतांची मागणी
निवडणूक रोखे योजना रद्द करत सुप्रीम कोर्टाने कुणी कोणत्या पक्षाला किती पैसे दिले याची माहिती निवडणूक आयोगाला देण्याचे आणि आयोगाने ते सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. ६ मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टाने वेळ दिलेला आहे. पण, एसबीआय बँकेने ३० जून २०२४ पर्यंत वेळ वाढवून मागितला आहे. यावर ट्विट करत संजय राऊतांनी मोदींनाही चिमटा काढला आहे.
राऊतांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हे काय चाललं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अपमान केला म्हणून एसबीआय चेअरमन आणि संचालकांना शिक्षा केली पाहिजे. मोदीजींनी भारत बदलून टाकला आहे, आता डिजिटल इंडिया आहे. आणि एसबीआय निवडणूक रोख्यांची माहिती सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे चार महिन्यांचा वेळ मागत आहे. त्यांची हिमंत कशी झाली पंतप्रधान मोदीजींचा अपमान करण्याची, जे ९ वर्ष १० महिने ३६५ दिवसांत २० तास काम करत आहेत. आणि या कामचुकारांना चार महिने हवे आहेत. त्या सगळ्यांना तुरुंगात पाठवा. आराम हराम आहे", अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी एसबीआय बँकेवर केली आहे.
- 12:07 PM • 05 Mar 2024
मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावा जवळील एका वाडीत घडली आहे. समर्थ परशुराम तायडे, वय 6 वर्ष, रा.आमठाणा, ता.सिल्लोड, असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारी येथे गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला. कार्यक्रम आटोपून दि. 4 मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना मोबाईलची खराब बॅटरी बालकाने कानाला लावली आणी त्याच क्षणी त्याचा स्फोट होऊन यात बालकाचे कानाला व हाताच्या बोटाला गंभीर मार लागून त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सदरील घटनेमुळे संपुर्ण परीसरात हळहळ वक्त होत आहे .ॉ
- 12:02 PM • 05 Mar 2024
महायुतीच्या जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता
महायुतीच्या जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री मुंबईत येणार असुन यावेळी ते बैठक घेणार आहेत असे म्हटले जात आहे.
- 11:58 AM • 05 Mar 2024
भावना गवळींच्या समर्थकांची बॅनरबाजी
भावना गवळी समर्थकांची यवतमाळच्या दारव्हा शहरात पोस्टरबाजी पाहायला मिळत आहे. संजय राठोडच्या मतदार संघात भावना गवळी यांचे पोस्टर लागले आहेत. 'आम्हाला पराभवाची भिती नाही कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय', असा मजकूर या पोस्टरवर पाहायला मिळतोय.
- 10:58 AM • 05 Mar 2024
राज्य सरकारला मोठा झटका! साईबाबासह 5 जणांची निर्दोष सुटका
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात मोठा निकाल दिला. जी.एन. साईबाबा आणि इतर चार आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे आदेश नागपूर खंठपीठाने दिला.
- 09:16 AM • 05 Mar 2024
राष्ट्रवादी काँग्रेसला हवे असलेले मतदारसंघ
गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर, गडचिरोली या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवे आहेत.
- 09:16 AM • 05 Mar 2024
शिंदेंच्या शिवसेनाला कोणत्या जागा हव्यात?
रामटेक, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक, पालघर, कल्याण, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई , ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ, धाराशिव (उस्मानाबाद), कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे.
- 09:16 AM • 05 Mar 2024
अमित शाह दोन दिवस महाराष्ट्रात
अमित शाह यांचे मंगळवारी (५ मार्च) अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम आहेत. अमित शाह अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये रोड शो करणार आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी (४ मार्च) रात्री दहा वाजता ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पोहोचले. शाह मराठवाडा, विदर्भ, खान्देश या तीन महत्त्वाच्या विभागांना भेट देणार आहेत.
मराठवाडा हे मराठा आरक्षणाचे केंद्र आहे. त्यात जालनाही आहे, येथूनच मनोज जरांगे पाटील येतात. गृहमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा महायुतीमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू आहे.
महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपावरून वाद सुरू असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १६ जागा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना २२ जागांवर दावा करत आहे. त्यामुळे भाजपवर दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.
अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे विविध कार्यक्रमांद्वारे राज्यातील तरुणांना आणि आमच्या कष्टकरी कार्यकर्त्यांना भेटताना मला आनंद होत आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT