Maharashtra Lockdown: महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; पाहा कुठे काय सुरु, काय बंद
मुंबई: कोरोनाची (Corona) दुसरी लाट संपलेली देखील नसताना तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावू लागलं आहे. अशावेळी सरकारने पुन्हा एकदा निर्बंध (guidlines) कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात किंवा शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा महाराष्ट्रात कुठे-कुठे करण्यात आले आहेत निर्बंध कठोर. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli): कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका पाहता […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोनाची (Corona) दुसरी लाट संपलेली देखील नसताना तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावू लागलं आहे. अशावेळी सरकारने पुन्हा एकदा निर्बंध (guidlines) कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात किंवा शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
पाहा महाराष्ट्रात कुठे-कुठे करण्यात आले आहेत निर्बंध कठोर.
कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli):
हे वाचलं का?
कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका पाहता राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कल्याण-डोंबिवलीतही आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सोमवारपासून निर्बंधांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून केडीएमसी हद्दीत लेव्हल तीन अंतर्गत सोमवार पासून (28 जून) अनलॉकच्या निर्बंधात बदल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक बस वाहतूक शंभर टक्के क्षमतेने सुरु राहिल. उभे राहून प्रवास करता येणार नाही. हे बदल 5 जुलैपर्यंत असतील. अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
केडीएमसी हद्दीत काय सुरु, काय बंद ?
-
अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरु राहतील.
-
अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेही सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेर्पयत खुली राहतील. ही दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येतील.
-
मॉल्स, थिएटर, चित्रपटगृहे पूर्णपणे बंद राहतील.
-
हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत भोजनासाठी 50 टक्के आसन क्षमतेनुसार सुरु राहतील. तसेच 4 वाजल्यानंतर होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवा बंधनकारक राहील.
-
सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग, खेळ यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेचा वेळ देण्यात आला आहे.
-
खाजगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयांना 50 टक्के क्षमतेची मर्यादा असेल.
-
सामाजिक, राजकीय, मनोरंज सभारंभ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने करता येतील. लग्नास 50 व्यक्तींना उपस्थीत राहण्याची अनुमती आहे.
-
सार्वजनिक बस वाहतूक शंभर टक्के क्षमतेने सुरु राहिल. उभे राहून प्रवास करता येणार नाही.
-
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खाजगी बस, कार, टॅक्सीने जाण्यासाठी ई-पास लागेल.
PUNE Lockdown: पुणेकरांसाठी मोठी बातमी, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु; सोमवारपासून काय असणार कठोर निर्बंध?
पुणे (Pune):
राज्यात मागील काही दिवसापासून कोरोनाचे (Corona) रुग्ण हे पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाची चिंता वाढत आहेत. त्यातच राज्यात डेल्टा प्लसचे (Delta Plus) रुग्णही वाढू लागले आहेत.
अशावेळी दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पुण्यात (Pune) आता पुन्हा एकदा कठोर निर्बंध (Strict Restriction) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
जाणून घ्या सोमवारपासून पुण्यात कोणकोणते नवे नियम लागू होणार?
-
अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. अत्यावशयक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील.
-
सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी चारपर्यंतच सुरु राहणार; राज्य सरकारच्या निर्देशानुसार शहरात नवी नियमावली
-
हॉटेल दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
-
हॉटेल सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत आसनक्षमतेच्या 50 टक्के आणि दुपारी 4 नंतर तसेच शनिवार व रविवार पार्सल सेवा/घरपोच देता येतील.
-
खासगी कार्यालये दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार
-
पुणे मनपा हद्दीतील खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील.
-
कार्यक्रमास दुपारी 4 पर्यंत परवानगी
-
सामाजिक, धार्मिक, मनोरंजन कार्यक्रमास 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत परवानगी असेल. शनिवारी आणि रविवारी पूर्णतः बंद असेल.
-
लग्न समारंभ 50 तर अंत्यसंस्कारास 20 लोकांना परवानगी
-
लग्न समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत तर अंत्यसंस्कार, दशक्रिया कार्यक्रम 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे.
-
ई-कॉमर्स सेवांना परवानगी
-
ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्यास परवानगी राहील.
-
सायंकाळी 5 वाजेनंतर संचारबंदी
-
पुणे शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल तर सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू राहील. या काळात अत्यावश्यक कारण वगळता बाहेर पडता येणार नाही.
-
PMPML 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
-
पीएमपीएमएल बससेवा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून उभा राहून प्रवास करण्यास परवानगी नसेल.
-
मद्य विक्रीला सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत परवानगी
-
पुणे शहरात मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध असेल.
बुलडाणा (Buldhana):
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधीत रुग्ण आढळून येत असल्याने व या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये लेवल-तीन मधील तरतुदीनुसार निर्बंध सुरु ठेवण्याच्या सूचना असल्याने तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने घेतलेल्या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्याकरिता सोमवार (28 जून) सकाळी सात वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आहेत.
याअंतर्गत सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने आठवडाभर म्हणजे सोमवार ते रविवार उघडी ठेवता येणार आहे. मात्र बिगर जीवनावश्यक सेवेची दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु असतील मात्र शनिवार व रविवार पुर्णपणे बंद असणार आहेत.
Nagpur: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, नागपूरमध्ये निर्बंध कठोर करण्याचा निर्णय
सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा, किराणा, व भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पेय विक्रेता यांची दुकाने, पिठाची गिरणी इ. व सर्व प्रकाराची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने कोंबडी, मटन, पोल्ट्री मासे व अंडी यासह) दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दुध संकलन केंद्र, दुध वितरण व्यवस्था, पाळीव प्राणी यांची खाद्यपदार्थ विक्री दुकाने कृषी सेवा केंद्रे, कृषी निवीष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृह शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, शिव भोजन केंद्र 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे.
तर सर्व प्रकारची बिगर जीवनाश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने व प्रतिष्ठाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवता येतील. मात्र शनिवार व रविवार पूर्णत: बंद ठेवावे लागतील.
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ – सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेसह व त्यानंतर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत व शनिवार रविवार पार्सल टेकअवे व घरपोच सेवा फक्त
सार्वजनिक ठिकाणे, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे, मॉनिंग वॉक व सायकलिंग – दरारोज सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत
सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना व कार्यालये- नियमितपणे
कार्यालयीन उपस्थिती- शासकीय, निमशासकीय व खाजगी- नियमितपणे
क्रीडा, खेळ – सकाळी पाच ते दुपारी नऊ वाजेपर्यंत
सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमलने, मनोरंजनात्मक कार्यक्रम
स्थानिक प्राधिकरण यांचे पुर्वपरवानगीने व 50 टक्के आसन क्षमतेसह लग्न समारंभ (कॅटरींग, बँडपथक, वधू-वर पक्ष सह) 50 लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालये, सभागृह, विवाह स्थळी (कोरोनाच्या नियमांच्या पालनसह) पूर्व परवानगीसह (शहराकरीता उपविभागीय अधिकारी, तालुका स्तरावरुन संबंधित मुख्याधिकारी नगर परिषद, नगरपालीका तसेच ग्रामीण क्षेत्राकरीता तहसिलदार)
अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीसह
जिल्ह्यात बाजारपेठांना चार वाजेपर्यंत मुदत; शनिवार रविवार पूर्णतःबंद
परभणी (Parbhani):
परभणीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी ( ता26) दुपारी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे बाजारपेठातील व्यवहारास सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मुदत बहाल केली आहे.
शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा अपवाद बाजारपेठा पूर्णतः बंद राहतील असे स्पष्ट केले आहे. सायंकाळी चार वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू राहील असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले आहे. आदेश सोमवार पासून लागू राहिल. या आदेशात तपशीलवार माहिती दिली आहे.
पवारांच्या काटेवाडीत सात दिवसांचं लॉकडाउन, कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय
अकोला (Akola):
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधीत रुग्ण आढळून येत असल्याने व या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये लेवल-तीन मधील तरतूदीनुसार निर्बंध सुरु ठेवण्याच्या सूचना असल्याने तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अकोला जिल्ह्याकरिता सोमवार दि. 28 जूनचे सकाळी सात वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
-
सर्व प्रकारची बिगर जिवनाश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने व प्रतिष्ठाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील.
-
(सोमवार ते शुक्रवार सुरु शनिवार व रविवार पूर्णत: बंद)
-
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेसह व त्यानंतर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत व शनिवार रविवार पार्सल टेक अवे व घरपोच सेवा फक्त
-
सार्वनिक ठिकाणे, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे, मॉनिंग वॉक व सायकलिंग दररोज सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
-
क्रीडा, खेळ सकाळी पाच ते दुपारी नऊ वाजेपर्यंत
-
सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमलने, मनोरंजनात्मक कार्यक्रम
-
स्थानिक प्राधिकरण यांचे पूर्वपरवानगीने व 50 टक्के आसन क्षमतेसह
-
लग्न समारंभ (कॅटरींग, बँडपथक, वधू-वर पक्ष सह) 50 लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालये, सभागृह, विवाह स्थळी (कोरोनांच्यानियमांच्या पालनसह)
-
अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थिती
-
सभा, बैठका, स्थानिक प्राधिकरण निवडणूक, सहकारी संस्था यांचे आमसभा आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत
-
बांधकाम फक्त साईट असणारे प्रत्यक्ष मजुर अथवा बाहेरुन मजुर आणण्याच्या बाबतीत दुपारी चार वाजेपर्यंत
-
कृषी विषयक सेवा व कृषी सेवा केन्द्रे दुपारी चार वाजेपर्यंत
-
ई कॉमर्स वस्तू व सेवा नियमितपणे पूर्ण वेळ (कोव्हिड नियमांचे पालन करुन)
-
जीम, व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर
-
एकूण क्षमतेच्या 50 टक्के पूर्व नोंदणी (Appointment) सह वातानुकूलित सेवेस परवानगी नाही
-
सार्वजनिक वाहतूक सेवा
-
पूर्ण आसन क्षमतेसह वाहतूकीस परवानगी राहील तथापि प्रवासी यांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील.
-
जास्तीत जास्त तीन लोकांना परवानगी (चालक, मदतनीस व इतर एक) नियमितपणे पूर्ण वेळ वाहतूक करता येईल.
-
आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी, कार, टॅक्सी, बस, रेल्वे व्दारा)
-
नियमितपणे पूर्ण वेळ परंतु लेव्हेल पाच मध्ये जिल्ह्यामधून जाणे येणे होत असल्यास ई-पास बंधनकारक
-
उत्पादन क्षेत्र, एमआयडीसी
-
उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक वस्तु व त्याकरीता लागणारे कच्चा माल उत्पादक व पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा, निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग, संरक्षण संबंधीत उद्योग डाटा सेंटर, क्लॉऊड सर्व्हीस प्रोव्हायडर, माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुतीचे पायाभूत सेवा व उद्योग)
-
उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग वगळून इतर सर्व प्रकारचे उद्योग जे अत्यावश्यक सेवा अंतर्गत समाविष्ट नाही व निर्यात प्रधान नाहीत)
संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच सायंकाळी पाच नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच पर्यंत संचारबंदी लागू राहील. या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करण्यास मनाई राहील.
आस्थापना/दुकाने/प्रतिष्ठाने ई ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत स्वच्छता व सार्वजनिक शिस्तीचे पालन करावे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश कायम आहे. त्याचे अधिकार संबंधित अनुज्ञप्ती प्राधिकारी, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन विभाग यांचे राहतील.
वरील आदेश हे सोमवार दिनांक 28 जून 2021 चे सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.
Delta Plus व्हेरिएंटविरूद्ध कोरोना लस किती प्रभावी, लस नव्या व्हेरिएंटशी लढू शकते?
वाशिम (Washim):
राज्य शासनाने निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 28 जून 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजेपासून ते 12 जुलै 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात नवीन नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू राहील. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, 26 जून रोजी निर्गमित केले आहेत.
जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. याठिकाणी ए. सी.चा वापर करण्यास मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगला सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. बाहेर मोकळ्या जागेत सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत क्रीडा विषयक बाबींना मुभा राहील.
विवाह समारंभामध्ये 50 लोकांच्या उपस्थितीस व अंत्यविधीस 20 लोकांच्या उपस्थितीस मुभा राहील. कृषि संबंधित बाबी दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. ई-कॉमर्स वस्तू सेवा कोविड नियमांचे पालन करून नियमितपणे पूर्णवेळ सुरु राहतील. बांधकाम फक्त इन सिटू किंवा बाहेरून मजूर आणण्याच्या बाबतीत सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहील.
खाजगी बँक, विमा, औषधी कंपनी, सूक्ष्म वित्त संस्था व गैर बँकिग वित्तीय संस्था यांची कार्यालये नियमितपणे सुरु राहू शकतील. उर्वरित खासगी कार्यालये, आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषि, बँक, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय, एलआयसी, एमएसआरटीसी आदी शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. उर्वरित सर्व शासकीय कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.
सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहील. मात्र, प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील. कार्गो वाहतूक सर्व्हीसेस जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह कोविड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करून नियमितपणे सुरु राहील. खाजगी कार, टॅक्सी, बस व ट्रेनमधून होणारी आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक नियमितपणे पूर्णवेळ सुरु राहील. मात्र, प्रवासी लेवल-5 मधील जिल्ह्यातून येत असल्यास ई-पास बंधनकारक राहील.
उत्पादन क्षेत्रातील निर्यात प्रधान उद्योग, अत्यावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल उत्पादित, पॅकेजिंग व संपूर्ण साखळी सेवा, निरंतर प्रक्रिया असणारे उद्योग, संरक्षण सबंधित उद्योग, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सुविधा सेवा व उद्योग कोविड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करून नियमितपणे पूर्णवेळ सुरु राहतील. याशिवाय उत्पादन क्षेत्रातील इतर उद्योग 50 टक्के मनुष्यबळासह सुरु राहतील.
अहमदनगर (Ahmednagar):
अहमदनगर जिह्यातही लेव्हल 3 चे नियम लागू : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा आदेश.
-
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत खुली
-
सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, त्या आधी दिवसभर जमावबंदी
-
विवाहासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 जण उपस्थित राहू शकणार
-
हॉटेल 50 टक्के क्षमतेने
-
सार्वजनिक वाहतूक 100 टक्के सुरू
सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. जे राज्यात लेव्हल 3 चे नियम आहेत, ते सर्व अहमदनगर जिल्ह्यात सोमवार 28 जून पासून लागू होणार
Mumbai Corona Cases: चिंताजनक… मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ
नागपूर (Nagpur):
कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) सुरु होऊन जवळजवळ चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रात (Maharashtra) दररोज 10 हजारांच्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यातच डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळेच आता नागपूरमध्ये (Nagpur) देखील पुन्हा एकदा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला आहे. कोव्हिड डेल्टा प्लस व्हेरीएंट व तिसऱ्या संभाव्य लाटेची (Third Wave) शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक स्तरावरही निर्बंध बदलण्यात आले आहेत.
पाहा नागपूरमध्ये सोमवारपासून कोणते नियम लागू होणार?
-
सर्व दुकानं फक्त दुपारी चारवाजेपर्यंत सुरू ठेवता येणार.
-
मॉल्स बंद राहणार
-
हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
-
लग्नकार्य पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्येच करता येणार.
-
अंतयात्रेला 20 लोकांची परवानगी असणार.
-
जिम, सलून ,स्पा दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
-
स्विमिंग पूल बंद असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT