Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीसांची जवळीक वाढतेय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Devendra Fadnavis Aaditya Thackeray : महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. याची सुरुवात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतरच सुरू झाली होती. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर तर दोन्ही बाजूंनी होणारी टीका विखारी झाल्याचं दिसत होतं. पण आता असं काय झालंय की ठाकरे आणि फडणवीसांची जवळीक वाढल्याची चर्चा होतेय?

ADVERTISEMENT

भाजप, ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर टीका करताना थकत नाहीत. शिंदे – फडणवीस सरकार राज्यात असताना राज्यातला राजकीय संघर्ष तापलेला असताना आता मात्र ठाकरे – फडणवीसांच्या जवळकीची चर्चा सुरू झाली आहे.

त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी लोणी इथल्या महसूल परिषदेतनंतर माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया…

हे वाचलं का?

Devendra Fadnavis: ‘पहाटेच्या शपथविधीचं सत्य..’, फडणवीस काय म्हणाले?

आदित्य ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रू नसून, आम्ही वैचारिक विरोधक झालोय. कारण ठाकरे यांनी दुसरा विचार पकडलाय. त्यामुळे आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू बिलकुल नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. राजकारणात वैचारिक विरोध असतो, मात्र अलिकडच्या काळात शत्रुत्व बघायला मिळतेय ते योग्य नाही. ते कधीतरी संपवावे लागेल.”

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंनी फडणवीसांबद्दल काय सांगितलं होतं?

गंमत म्हणजे अगदी काही तास आधी लोकमत समूहाच्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कटुता नाही, माझे मन साफ आहे. आमच्या घरात असेच वातावरण आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतरच फडणवसांनी ठाकरे हे शत्रू नाही तर विरोधक आहेत असं विधान केलंय.

Uddhav Thackeray: ‘विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते’, ठाकरेंचं मोठं विधान

कटुता संपवण्यासाठी पुढाकार घेईन -फडणवीस

महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे आणि ती संपविण्यासाठी मी पुढाकार घेईन, असे देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपुर्वी म्हणाले होते. त्यावेळी त्यांच्या या विधानाचं संजय राऊतांनी स्वागतही केलं होतं. जानेवारी 2023 मध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी कारमधून आल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावेळीही शरद पवारांबरोबर फार काळ कटू राहिलं नाही.

कधी काळी अत्यंत बोचरी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली. महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुंबई Takला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी ‘शिवसेनेने आमच्याबरोबर गद्दारी केली. माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. त्याचा आम्ही बदला घेतला’, अशी शब्दात प्रतिक्रिया दिली होती.

Rahul Narwekar: ठाकरे गटाचं काय होणार? विधानसभा अध्यक्षांनी सांगितला कायदा

एका अर्थी ठाकरे गटाला फडणवीसांनी डिवचलं होतं. पण याच फडणवीसांनी अगदी काही दिवसांपूर्वी शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातली कटूता संपली पाहिजे असं विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे आणि ती संपविण्यासाठी मी पुढाकार घेईल, असं म्हटलं होतं.

आता ही महाराष्ट्राच्या राजकारणात आलेली कटुता संपविण्याची सुरुवात आहे का आणि त्याची सुरुवात शरद पवारांबरोबर एकत्र केलेल्या गाडीतल्या प्रवासातून झाली का? हे कोणाला सांगता येणार नाही.

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टातील 12 मुद्दे ठरवणार ठाकरेंचं भवितव्य!

मात्र कसबा चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम संपताना ठाकरे आणि फडणवीसांच्या जवळकीची चर्चा होतेय ही गोष्ट कुणाच्याही नजरेतून सुटलेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT