महाराष्ट्र अनलॉक! राज्यातले सर्व कोरोना निर्बंध उठवले, जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
राज्यातले सर्व कोरोना निर्बंध उठवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. गुढी पाडव्याच्या मिरवणुका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणुका जोरात काढा असं ट्विट करत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने मंजूर झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्य अनलॉक झालं […]
ADVERTISEMENT
राज्यातले सर्व कोरोना निर्बंध उठवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. गुढी पाडव्याच्या मिरवणुका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणुका जोरात काढा असं ट्विट करत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने मंजूर झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्य अनलॉक झालं आहे. कोणतेही निर्बंध आता राज्यात असणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
ADVERTISEMENT
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचं प्रमाण अत्यल्प झालं आहे. त्यामुळे अनेक निर्बंध शिथील करण्यात आले होते. सरसकट सगळे निर्बंध मात्र उठवण्यात आलेले नव्हते. आज मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. कोरोना काळ हा आपल्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर होता. वाढलेले कोरोना रूग्ण, संसर्ग असं सगळं होऊ नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेनंतर निर्बंध हळूहळू शिथील करण्यात आले होते. आता निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून राज्यात कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
हे वाचलं का?
राज्यात कोरोना रूग्ण आहोत मात्र त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. कोरोनाची साथ असताना राज्यात विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले होते. प्रवासावर, एकत्र जमण्यावर, लग्नकार्यांवर, अंत्यविधींवर सगळ्यांवर निर्बंध होते. थिएटर्स, शाळा, महाविद्यालयं सगळं बंद करण्यात आलं होतं. मात्र जसजसे कोरोना रूग्ण कमी होत गेले तसतसे कोरोना निर्बंध शिथील होत गेले. कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले नव्हते. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सगळ्या मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार होते. आज ती बैठक पार पडली. त्यामध्ये एकमताने सगळे निर्बंध उठवण्याचा निर्णय झाला आहे.