Maharashtra Unlock : महाराष्ट्र होणार पूर्ण ‘अनलॉक’; विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती

मुंबई तक

– योगेश पांडे, नागपूर महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती जवळपास निवळली असून, दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्यानं निर्बंध हटवले जाणार अशी चर्चा राज्यात सुरू आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही निर्बंध हटवण्याबद्दल माहिती दिली आहे. महिनाअखेरीस महाराष्ट्र अनलॉक होईल, असं वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि निर्बंध […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

योगेश पांडे, नागपूर

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती जवळपास निवळली असून, दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्यानं निर्बंध हटवले जाणार अशी चर्चा राज्यात सुरू आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही निर्बंध हटवण्याबद्दल माहिती दिली आहे. महिनाअखेरीस महाराष्ट्र अनलॉक होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील कोरोना परिस्थिती आणि निर्बंध हटवण्यासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात मुंबईपासून कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली होती. आता परिस्थिती निवळत आहे आणि महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करीत आहे.’

महाराष्ट्रात मास्क मुक्तीचा निर्णय झालाय का? अजित पवारांनी थेट दिलं उत्तर, म्हणाले…