Mumbai Local : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मोबाइलवरून काढता येणार लोकलचं तिकिट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र सरकारने मुंबईतून लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता मुंबई लोकलचं तिकिट मोबाइलवरूनही बुक करता येणार आहे. यासाठी अँड्रॉईडवर UTS नावाचं App उपलब्ध आहे. तर iOS ची सेवाही मंगळवारी रात्रीपासून सुरू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. (fully vaccinated people get Local railway tickets and passes via uts mobile app)

ADVERTISEMENT

ज्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना आता मोबाइलवरून तिकिट काढता येणार आहे. त्यासाठी त्यांना आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही. UTS अर्थात Unreserved Ticketing System द्वारे अँड्रॉईड फोन असणाऱ्यांना लोकल ट्रेनचं तिकिट काढता येणार आहे. तसंच iOS वर तिकिट काढता येण्याची सेवाही मंगळवारपासून सुरू होणार आहे. रेल्वे अधिकारी अनिल कुमार लाहोटी यांनी ANI ला ही माहिती दिली आहे. ज्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना हे तिकिट काढता येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यापासून ज्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करता यावा म्हणून एक ऑनलाइन इ पास सेवा सुरू केली होती. आता मोबाइलवरून तिकिट काढता येण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचणार आहे.

हे वाचलं का?

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्याला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळायचा.

18 वर्षाच्या आतील मुलांना आणि काही मेडिकल कन्डिशनमुळे लस घेऊ शकले नसणाऱ्या नागरिकांना 15 ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जाऊ लागला आहे. 18 वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासासाठी पास देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळं 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच काही महत्वाच्या मेडिकल कन्डिशनमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे. अशा लोकांनी पास काढतेवेळी तसं डॉक्टरांचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT