Rain update : पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार
राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे. राज्यात मान्सूनचं आगमन होण्यास अवकाश असला, तरी वातावरणीय बदलांमुळे राज्यातील काही भागात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांतील हवामानाचा अंदाज व्यक्त केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह […]
ADVERTISEMENT

राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
राज्यात मान्सूनचं आगमन होण्यास अवकाश असला, तरी वातावरणीय बदलांमुळे राज्यातील काही भागात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांतील हवामानाचा अंदाज व्यक्त केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
६ जूनसाठीचा अंदाज
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ६ जून रोजी राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.