Maharashtra Board SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल सगळ्यात आधी 'इथे' दिसणार
Maharashtra Board SSC Result 2026 Website link: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी (SSC) परीक्षेचा निकाल 8 मे रोजी जाहीर करणार आहे. विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in/mr आणि mahresult.nic.in वर पाहू शकतील.
ADVERTISEMENT

How to Check Maharashtra SSC Result 2026 Website: महाराष्ट्र बोर्डाने 2026 मध्ये नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला होता. आता, दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा देखील संपली आहे. कारण महाराष्ट्र SSC निकाल उद्या (8 मे) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर थेट लिंक सक्रिय केली जाईल.
8 मे रोजी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वीचा निकाल 2026 जाहीर करण्याआधी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), एक पत्रकार परिषद घेऊन राज्याचा समग्र निकाल जाहीर करेल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होईल. जो विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी mahahsscboard.in/mr आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट्सवर पाहायला मिळेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता 10 वीचा निकाल 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. विद्यार्थी आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून आपला निकाल तपासू शकतील. निकालामध्ये विद्यार्थ्याचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सर्व विषयांमधील गुणांचा समावेश असेल.
महाराष्ट्र SSC निकाल 2026 ची लिंक कुठे मिळेल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर करताच, mahahsscboard.in आणि sscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइट्सवर एक थेट लिंक सक्रिय केली जाईल. त्यानंतर विद्यार्थी आपला आसन क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती टाकून सहजपणे आपला निकाल तपासू शकतील आणि गुणपत्रिका डाउनलोड करू शकतील.









