वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात महिला काँग्रेसचं चूल पेटवा आंदोलन, सिलिंडरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा
नागपुरात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात सायकल रॅली भर पावसात काढण्यात आली होती, त्यांनतर आज नागपुरात महिला काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चूल पेटवून वाढलेल्या गॅसच्या किंमतींचा निषेध केला. यावेळी महिलांनी घरगुती गॅस सिलेंडरची प्रेतयात्रा काढून महागाईसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप […]
ADVERTISEMENT
नागपुरात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात सायकल रॅली भर पावसात काढण्यात आली होती, त्यांनतर आज नागपुरात महिला काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चूल पेटवून वाढलेल्या गॅसच्या किंमतींचा निषेध केला. यावेळी महिलांनी घरगुती गॅस सिलेंडरची प्रेतयात्रा काढून महागाईसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल,डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे असाही आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
गुरूवारीच नाना पटोले यांनीही मोदी सरकारविरोधात रॅली काढली होती. आता आज महिला काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर वाढवले असल्याने आम्ही पावसात ही रॅली काढली होती. त्याचप्रमाणे आज महिला काँग्रेसने आंदोलन केलं. चुलीवर स्वयंपाक करून त्यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदवला. लोकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस कायमच पुढाकार घेत असतं यापुढेही घेणार आहे असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
हे वाचलं का?
मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवले असल्याने सामान्य माणसांचं जगणं कठीण झालं आहे. सामान्य माणसांनी काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे महागाई वाढली आहे अशात जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही ही रॅली काढली होती असं नाना पटोले यांनी गुरूवारी सांगितलं. तसंच आज झालेल्या आंदोलनाची कल्पनाही त्यांनी कालच दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे केंद्र सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. इंधन दरवाढीमुळे आणि गॅसच्या दरवाढीमुळे सामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. मोदी सरकार जोपर्यंत पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT