नंदीग्राममधून ममता बॅनर्जी १०० टक्के जिंकणार – संजय राऊतांना विश्वास
पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंद्रीग्राम विधानसभा मतदार संघाचं मतदानही याच टप्प्यात पार पडलं जाणार आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने पश्चिम बंगालची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्री पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी येत आहेत. ममता बॅनर्जींविरोधात भाजप […]
ADVERTISEMENT
पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंद्रीग्राम विधानसभा मतदार संघाचं मतदानही याच टप्प्यात पार पडलं जाणार आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने पश्चिम बंगालची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्री पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी येत आहेत. ममता बॅनर्जींविरोधात भाजप सर्व शक्ती एकवट असताना दुसरीकडे भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने नंदीग्राममधून ममता बॅनर्जीच १०० टक्के जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
“पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुका या अत्यंत महत्वाच्या आहेत, या निवडणुकांचा जो काही निकाल लागेल त्यावरुन देशाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरेल. विशेषकरुन आसाम आणि पश्चिम बंगालचे निकाल अत्यंत महत्वाचे असतील. पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं महाभारत हे खऱ्या महाभारतापेक्षा अधिक भयानक आहे. एकीकडे देशात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे, पण दुसरीकडे संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळ ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी मैदानात उतरलंय. देश सगळं काही पाहतो आहे, पश्चिम बंगालमधली जनता सुज्ञ आहे…नंदीग्राममधून ममता बॅनर्जी १०० टक्के जिंकतील.” शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली.
शरद पवार ते मुख्यमंत्री ठाकरे… ममतादीदींनी देशातील बड्या नेत्यांना लिहलं पत्र!
हे वाचलं का?
काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी देशातील बिगर भाजप नेत्यांना लोकशाही धोक्यात असून भाजपविरोधात एकत्र येण्याचं आवाहन करण्याचं पत्र लिहीलं होतं. यावर बोलत असताना राऊत म्हणाले, “याआधीही लोकशाही धोक्यात होतीच, कोणाला असं वाटत असेल की लोकशाही आता संकटात आहे तर असं नाहीये. याआधीही अशी परिस्थिती तयार झाली होती. या देशात लोकांनी लढा देऊन आतापर्यंत लोकशाही जिवंत ठेवली आहे.” ममता बॅनर्जींनी पत्रात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. आम्ही याच्यावर विचार करु, या गोष्टीवर चर्चा व्हायला हवी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT