मला तपासयंत्रणांकडून त्रास दिला जातोय!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणी सध्या राज्यात मोठा भूकंप झाला आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुंब्रा येखील खाडीत सापडला. दरम्यान अधिवेशनात विरोधीपक्षाने हिरेन आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्या संबंधांवरुन सत्ताधारी पक्षातील शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आपली कार चोरीला गेल्यानंतर हिरेन यांनी पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतू आपल्या गाडीचा वापर हा अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यासाठी झाल्याचं समजताच हिरेन यांच्यामागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला.

ADVERTISEMENT

ठाणे पोलीसांचा भाग नसलेले सचिन वाझे पोस्ट पार्टमच्या ठिकाणी कसे?

मुंबई पोलीस, एटीएस, NIA यासारख्या यंत्रणांनी हिरेन यांची चौकशी केली. या चौकशीचा आपल्याला मानसिक त्रास होत असल्याची तक्रार करणारं पत्र हिरेन यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई-ठाणे पोलीस आयुक्तांना लिहीलं होतं. हे पत्र मुंबई तकच्या हाती लागलं आहे. या पत्रात हिरेन यांनी सचिन वाझे, जॉईंट सीपी भारंबे यांच्याकडून आपली वारंवार चौकशी होत असल्याचं म्हटलं आहे. या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असून काही पत्रकार या प्रकरणात मला व माझ्या परिवाराला नाहक त्रास देत असल्याचं हिरेन यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

माझी गाडी चोरीला कशी गेली याची सर्व माहिती पोलिसांना दिल्यानंतरही आपल्याला वारंवार तेच-तेच प्रश्न विचारले जात असल्याचं हिरेन यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. या चौकशीचा आपल्याला मानसिक त्रास होत असून याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी हिरेन यांनी केली होती. दरम्यान विरोधीपक्षाने आणलेल्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी एटीएसकडे सोपवली आहे. मनसे आणि भाजपने याप्रकरणात सचिन वाझे आणि शिवसेनेचं जुन कनेक्शन बाहेर काढत सरकारसमोरील अडचणी वाढवल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT