भारत अडचणीत असला म्हणून काय झालं, काळजी करु नका ‘हे’ मित्र आहेत खंबीर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट हे मागील वर्षभरापासून जगावर (World) घोंघावत आहे. त्यातही भारत (India) हा रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. कारण आतापर्यंत 2 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे भारतातील वैद्यकीय सेवेवर (Medical Service) प्रचंड ताण पडत आहे. त्यातच वैद्यकीय सेवेशी निगडीत अनेक अत्यावश्यक गोष्टींची प्रचंड वानवा जाणवत आहे. त्यामुळे हा काळ भारतासाठी प्रचंड अडचणीचा असा आहे. मात्र, असं असलं तरीही भारत हा लढवय्या देश आहे आणि त्यामुळेच आता भारताचे खरे मित्र देखील त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. भारताचे हे मित्र फक्त पाठिशीच नाही तर भरभरुन मदत देखील करत आहेत.

ADVERTISEMENT

भारतात वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा आहे आणि प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासन प्राणपणाने झगडतं आहे. अशावेळी अनेक मित्र देशाने भारताला सढळ हस्ते मदत करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारताला अनेक देशांनी मोलाची मदत केली आहे. जाणून घेऊयात कोण आहे हे भारताचे खरे मित्र!

दिलदार पॅट कमिन्स ! करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान सहायता निधीला भरघोस मदत

हे वाचलं का?

पाहा कोरोना संकट काळात आतापर्यंत कोणकोणता देश भारताच्या मदतीला आला आहे धावून:

1. दक्षिण कोरिया- ऑक्सिजन सिलेंडर, कन्सन्ट्रेटर यांची पहिली पहिली खेप आज दक्षिण कोरियामधील इंचियॉनहून भारतात पाठविली गेली आहेः भारतीय दूतावास, सोल

ADVERTISEMENT

2. युनायटेड किंगडम- युनायटेड किंगडमहून 3 ऑक्सिजन जनरेटर आणि 1,000 व्हेंटिलेटर दिल्लीला पोहचले. प्रत्येक ऑक्सिजन जनरेटर हे एक मिनटात 500 लीटर ऑक्सिजनचं उत्पादन करतं.

ADVERTISEMENT

3. ऑस्ट्रिया आणि झेक प्रजासत्ताक- ऑस्ट्रियाहून 1900 ऑक्सिजन कॅन्युलस आणि 396 ऑक्सिजन सिलेंडर आणि झेक प्रजासत्ताकमधून 500 ऑक्सिजन सिलेंडर्स आज भारतात दाखल झाले.

कोरोनाशी लढा : लता मंगेशकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ७ लाखांची मदत

4. अमेरिका- ‘रेमडेसिवीरचे 25,000 डोसची तिसरी खेप अमेरिकेतून भारतात पोहोचली आहे. आतापर्यंत अमेरिकेकडून भारताला 1,80,000 डोस मिळाले आहेत.’ असे ट्विट अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजितसिंग संधू यांनी केले आहे.

5. जपान- आज आमचा साथीदार आणि मित्र जपानकडून 100 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर ही खास भेट पाठविण्यात आली आहेत: अरिंदम बागची, अधिकृत प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय (MEA)

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत अजिंक्यची अनोखी मदत, ‘मिशन वायू’साठी ३० Oxygen Concentrators दान

6. कॅनडा – कॅनडाहून 50 व्हेंटिलेटर आणि 25,000 रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस भारतात दाखल

7. जर्मनी – जर्मनीने 4,00,000 लिटर ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता असलेला एक ऑक्सिजन प्लांट भारतात पाठविला आहे. हा प्लांट डीआरडीओद्वारा संचालित सरदार वल्लभभाई पटेल कोव्हिड रुग्णालयात कार्यरत असेल. भारतातील जर्मन राजदूत वाल्टर जे लिंडनर यांनी आज या प्लांटचे निरिक्षण केले.

8. थायलंड – थायलंड सरकारद्वारे पाठविण्यात आलेले 200 ऑक्सिजन सिलेंडर आणि 10 आणि 10 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आणि तेथील स्थायिक भारतीय नागरिकांकडून दान करण्यात आलेले 100 ऑक्सिजन सिलेंडर आणि 60 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर दिल्लीत पोहचले

कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सोनू निगम पुढे सरसावला; ऑक्सिजन पुरवठ्याची करणार मदत

9. सिंगापूर – ‘कोव्हिड-19 च्या विरोधातील लढाईत आम्ही भारतासोबत आहोत. द्विपक्षीय आणि बहु-एजन्सी प्रयत्नातून @IAF_MCC विमानाने सिंगापूरमधील @ChangiAirport येथून 4 क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर नेण्यात आले’

10. इस्रायल – ‘भारत हा आमच्या सगळ्यात जवळच्या आणि महत्त्वाच्या मित्र देशांपैकी एक आहे. भारतातील संकटाच्या या प्रसंगी इस्रायल भारतासोबत असून आमच्या भारतीय बंधू आणि भगिनींसाठी आयुष्य वाचवणारी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य प्रकारची मदत पाठवत आहे. भारत आणि इस्रायलमधील संबंध सामरिक भागीदारीच्या स्वरुपाचे असून त्यात राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे.’ इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्कनाझी यांनी म्हटले आहे.

भारताला आतापर्यंत या देशांसह इतरही अनेक देश हे सातत्याने मदत पुरवित आहेत. त्यामुळे भारत कोरोनाविरुद्धची लढाई अत्यंत सक्षमपणे लढू शकत आहे. भारताला सातत्याने केली जाणारी ही मदत खूपच मोलाची ठरत आहे. (Many big countries in the world are doing a lot to help India its difficult times)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT