लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी काय घडलं? ‘चहापेक्षा किटली गरम?’ म्हणणाऱ्या हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. सगळा देश हळहळला. याच दिवशी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी कलाकार या ठिकाणी दिसले नाहीत अशी एक चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. त्याला अभिनेत्री हेमांगी कवीने उत्तर दिलं होतं. हे उत्तर चर्चेत असतानाच आता तिची नवी पोस्ट समोर आली आहे. या पोस्टमध्ये तिने चहापेक्षा किटली गरम असा उल्लेखही केला आहे. हेमांगी कवीची ही पोस्टही चर्चेत आहे.

ADVERTISEMENT

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नेमका काय वाद सुरू झाला आहे?

काय आहे हेमांगी कवीची पोस्ट?

हे वाचलं का?

‘चाय से ज्यादा किटली गरम’

परवा मयूर अडकरच्या पोस्टवर खरंतर विचारलेल्या प्रश्नावर मी कमेंट केली. मला आलेला अनुभव शेअर केला. स्वतंत्र पोस्ट लिहिली नाही. त्या कमेंटमध्ये ही मी गायक जे हिंदीत प्रसिद्ध आहेत शान, मिका सिंग, शैलेंद्र सिंग, कैलास खेर, कविता पौडवाल, मराठीतले गायक बेला शेंडे, नंदेश उमप यांना जवळून दर्शन मिळावं म्हणून खूप प्रयत्न करावे लागले जे सहजरित्या मिळू शकत होतं हे नमूद केलंय. यात कुठेही पोलिसांनी बॉलिवूड, हिंदी आणि मराठी असा फरक केला नाही. जर केला असेल तर तो फरक बॉलिवूड किंवा हिंदीत काम करणाऱ्यांनी केला का? तर नाही! पोलिसांना वाटलं अमुक अमुक लोकांना पाठवायला हवं. त्यांच्या मनाला वाटलं त्या लोकांनाच सहजपणे शेवटचं दर्शन घेऊ दिलं. किंवा त्यांच्यासाठी तशी सोय करण्यात आली असावी. हिंदीतल्या लोकांना आत सोडा आणि मराठील्या लोकांना नको असा काही criteria त्यांनी केला नाही. थोडक्यात मेरे मन को भाया….

ADVERTISEMENT

‘अक्षरशः भांडून लतादीदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं’, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

ADVERTISEMENT

माझी कलाकार म्हणून ओळख पटूनही हिंदीतल्या लोकांनी नाही तर मराठी असलेल्या आणि ओळखत असलेल्या मराठी पोलिसांनी मला आत जाण्यास मनाई केली. ही चूक हिंदी बॉलिवूडची? SRK नसेल म्हणाला ना या मराठी लोकांना आत सोडू नका बरं. राजकारण क्षेत्रातील आणि शासकीय मंडळींमुळे, त्यांच्या सुरक्षा कारणांमुळे मनाई केली. बरं त्यात ही या लोकांसाठी वेगळी सोय केली असताना सर्व gates वर मनाई केली. ती का केली हे पोलिसच चांगल्या प्रकारे सांगू शकतात.

प्रयत्नांती आत गेल्यावर पाहिलं तर तिथले पोलिस हिंदीतल्या गायक मंडळींना सुद्धा सतत मागे जाऊन बसायला सांगत होते आणि या हिंदी गायकांनाही शेवट पर्यंत थांबवूनच ठेवण्यात आलं. हिंदीतल्या विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर लाही इतर bollywood अभिनेत्यांसारखा थेट प्रवेश दिला नाही थांबवून ठेवलं. उशिराने आलेल्या आमिर खान, त्याची मुलगी, रणबीर कपूर, शंकर महादेवन यांना मात्र आमच्या अगदी बाजूने थेट आत सोडण्यात आलं. त्यामुळे सगळाच सावळा गोंधळ होता.

Covid मुळे तशी ही फार गर्दी नव्हती. सगळे सौजन्याने वागत होते. शांतीपूर्ण वातावरण होतं. सहज दर्शन मिळू शकलं असतं. पण नाही. तुम्ही कुणीही सेलिब्रिटी असलात तरी आता तुम्हांला जाऊ देणार नाही म्हणत दोन महिला पोलीस अधिकारी एकमेकींना टाळी देत हसल्या. तिथे काही हिंदीतल्या कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हांला पुन्हा अडवलं तेही मराठी पोलिसांनी! यात चूक त्या हिंदी कलाकारांची??? गोष्ट जेव्हा भांडणापर्यंत पोचली तेव्हा आम्हांला लताजींच्या पार्थिवाजवळ जाऊ देण्यास वाट मोकळी झाली. पार्थिवाजवळ पोहचल्यावर ना कुणी अडवलं ना हटकलं. अगदी घरच्या मंडळींप्रमाणे दर्शन घेऊ दिलं. हवा तितका वेळ थांबू दिलं! मंगेशकर कुटुंबीयांसोबत उभं केलं. पण गेट पासून ते इथपर्यंत जो काही प्रकार झाला तो म्हणजे ‘चाय से ज्यादा किटली गरम’ हाच होता!

मी या प्रकाराकडे वरून आलेले आदेश पोलीस पाळत होते आणि सरकारी प्रोटोकॉल्स याच अर्थाने पाहिलंय. पोलिसांनी हिंदी मराठी दोन्ही गायक कलाकारांपेक्षा नेते मंडळी, शासकीय लोकांना झुकतं माप दिलं गेल्याचं दिसलं हे मात्र तेवढंच खरं! कलाकारांच्या भावनेपेक्षा नेते मंडळींची सुरक्षा महत्वाची वाटली याला बॉलिवूड कसं जबाबदार?

बाकी काल सर्व प्रसार माध्यमांमध्ये माझ्या एका कमेंट मधून त्यांना हवा तो अर्थ काढून ‘मराठी कलाकारांना डावलण्यात आलं’, प्रवेश दिला नाही’ वगैरेच्या बातम्या तयार झाल्या त्याचं हे explanation!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT