Marathi Bigg Boss 3 : एलिमिनेशनच्या आधीच किर्तनकार शिवलीला पाटील घराबाहेर, जाणून घ्या कारण…
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. एक आठवड्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर प्रत्येक स्पर्धक आता टास्कदरम्यान आपले खरे रंग दाखवत आहेत. टास्कदरम्यान खेळाडूंमध्ये रंगणारे वाद, हेवेदावे यामुळे या शो ला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. पहिल्या आठवड्यात कोणत्याही स्पर्धकाचं एलिमिनेशन झालं नाही. परंतू या आठवड्यात एलिमिनेशन होणार असं महेश मांजरेकर यांनी जाहीर केलं […]
ADVERTISEMENT
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. एक आठवड्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर प्रत्येक स्पर्धक आता टास्कदरम्यान आपले खरे रंग दाखवत आहेत. टास्कदरम्यान खेळाडूंमध्ये रंगणारे वाद, हेवेदावे यामुळे या शो ला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. पहिल्या आठवड्यात कोणत्याही स्पर्धकाचं एलिमिनेशन झालं नाही.
ADVERTISEMENT
परंतू या आठवड्यात एलिमिनेशन होणार असं महेश मांजरेकर यांनी जाहीर केलं होतं. त्याआधीच युवा किर्तनकार आणि घरातल्या सदस्य शिवलीला पाटील घराबाहेर पडल्या आहेत.
Marathi Bigg Boss : जो माणूस स्वतःचा नाही तो…स्नेहा आणि अविष्कारमध्ये उडाले खटके
हे वाचलं का?
काही दिवसांपूर्वी शिवलीला पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होत होते. बिग बॉसने शिवलीला यांना हल्लाबोल टास्कमध्ये सहभागी न होण्याचीही मूभा दिली होती. परंतू त्यांची तब्येत पाहता बिग बॉसने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर काढलं आहे. शिवलीला घराबाहेर गेल्यामुळे व्होटींग लाईन बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बिग बॉसच्या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली ती म्हणजे तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. शिवलीला आणि तृप्ती यांच्यात वादही रंगल्यामुळे या दोघांमध्ये आगामी काळात कसा सामना रंगतो यासाठी सर्वांमध्ये उत्सुकता होती. परंतू त्याआधी तब्येत बिघडल्यामुळे शिवलीला यांना घराबाहेर पडावं लागलं आहे.
ADVERTISEMENT
Bigg Boss Marathi 3: एकमेकांवर अंडी,कचऱ्याचा मारा, बिग बॉसच्या घरात सुरू झालं हल्ला बोल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT