लाइव्ह
Uddhav Thackeray : “…आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत”
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस अधिक संवेदनशील होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊन उपोषण करणार आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम तातडीने हाती घेतले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकाही तोंडावर आल्या असून, त्यादृष्टीनेही राजकीय घडामोडी घडत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे… या महत्त्वाच्या विषयासह इतर घटनांबद्दल माहिती घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिवेशन लाईव्ह
ADVERTISEMENT

- 04:05 PM • 23 Jan 2024
पीएम केअर हा प्रभाकर मोरे केअर फंड नव्हता -उद्धव ठाकरे
नाशिकच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, "मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही प्रचार केला. मी प्रचार केला. त्यावेळी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो? वर्षानुवर्षे शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या. तुमच्या पुचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली नाही. माझ्या मर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली आहे. आज ते सगळे शिवसैनिक आज गुन्हेगार? अनिल परब गुन्हेगार, रवींद्र वायकर गुन्हेगार, किशोरीताई गुन्हेगार, सगळे गुन्हेगार?" - 01:11 PM • 23 Jan 2024
राम मंदिर मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना भाजपला सुनावलं
अयोध्येतील राम मंदिराचे श्रेय भाजपकडून घेतले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मोदींसह भाजपवर टीकेची तोफ डागली. प्रभू श्रीराम कुणा एका व्यक्तीचे वा पक्षाचे नाहीत. तुम्ही असं करणार असाल, तर आम्हालाही भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजपमुक्त जय श्रीराम", असं उद्धव ठाकरे म्हणाले. - 11:30 AM • 23 Jan 2024
संजय राऊतांची पंतप्रधानांवर निशाणा
नाशिक येथे शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. "प्रभू रामाशी आपलं जुनं नातं आहे. शिवसेनेचं अत्यंत जिव्हाळ्याचं, भावनिक नातं आहे. ते फक्त एखाद्या व्यक्तीचं किंवा पक्षाचं असतं असं नव्हे. शिवसेनेचे वाघ नसते, तर... शिवसेना नसती, तर काल प्रभू श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले, धैर्य आणि शौर्य दाखवलं आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करता आली", असे म्हणत राऊतांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. - 10:56 AM • 23 Jan 2024
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना केले अभिवादन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. उद्धव ठाकरे यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवलेले आहेत. तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे मागे उभे आहेत. हा फोटो पोस्ट करून ठाकरेंनी म्हटले आहे की, "साहेब, आपले आशीर्वाद हिच आमची ताकद." - 10:28 AM • 23 Jan 2024
पुणे जिल्ह्यात प्रवेश! जरांगे पाटलांची यात्रा कुठे पोहोचली?
मनोज जरांगे पाटील आता मुंबईत येऊन उपोषण करणार आहे. मनोज जरांगेंनी २० जानेवारी रोजी पदयात्रा सुरू केली. सोमवारी रात्री म्हणजे २२ जानेवारी रोजी त्यांचा रांजणगावमध्ये मुक्काम झाला. आता यात्रा निघाली असून, ते भीमा कोरेगावला पोहोचणार आहेत. तिथे दुपारचे जेवण करून नंतर यात्रा पुण्याच्या दिशेने निघेल. रात्री खराडी बायपास परिसरात पदयात्रेचा मुक्काम असणार आहे. - 09:14 AM • 23 Jan 2024
आरक्षणासाठी मराठा समाजाचे असे केले जाणार सर्वेक्षण
राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरूवात होत आहे. राज्यातील महसूल यंत्रणा सज्ज झाली असून, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.