सैराट.. विवाहित मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराचं नाकच टाकलं कापून!

मुंबई तक

Nagaur Crime: नागौर (राजस्थान): राजस्थानमधील नागौरमधून एक हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. येथे विवाहित प्रेयसीला (GiriFriend) पळवून नेल्याच्या आरोपावरून तरुणाच्या नातेवाइकांनी तरुणाला प्रथम बेदम मारहाण केली. त्यानंतर विळ्याने त्याचे नाकच कापण्यात आले. तरुण आणि तरुणी दोघांचेही लग्न झाले असून त्यांचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू होते. यामुळेच तरुणीच्या कुटुंबीयांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचलत तरुणाचं नाक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nagaur Crime: नागौर (राजस्थान): राजस्थानमधील नागौरमधून एक हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. येथे विवाहित प्रेयसीला (GiriFriend) पळवून नेल्याच्या आरोपावरून तरुणाच्या नातेवाइकांनी तरुणाला प्रथम बेदम मारहाण केली. त्यानंतर विळ्याने त्याचे नाकच कापण्यात आले. तरुण आणि तरुणी दोघांचेही लग्न झाले असून त्यांचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू होते. यामुळेच तरुणीच्या कुटुंबीयांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचलत तरुणाचं नाक कापलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (married daughter eloped with lover family cut off young mans nose)

हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी तरुणाला बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याचे नाक कापून टाकण्यात आले. यादरम्यान तो तरुण अक्षरश: तडफडत होता. दयेची याचना करत होता. मात्र तेथील एकाही व्यक्तीला त्याची अजिबात दया आली नाही.

याउलट आरोपी त्याला अधिक मारहाण करत होते. पीडित तरुणाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, स्थानिक लोकांनी जखमी अवस्थेत त्याला परबतसर येथील रुग्णालयात दाखल केले. जिथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना अजमेरला पाठवलं केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मुंबई : प्रेयसी गावी जाऊन नये म्हणून त्याने घेतला ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव

हे वाचलं का?

    follow whatsapp