पतीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, पत्नीने महिलेवर उकळतं तूप टाकलं; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पत्नीने महिलेवर उकळतं तूप टाकल्याची घटना ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या महिलेच सहा मार्चरोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तिच्या घरच्या लोकांनी सोमवारी म्हणेजच १५ मार्चला रात्री उशीरा वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

ठाण्याच्या लोकमान्य नगरमधील पाडा क्रमांक ४ मध्ये राहणाऱ्या मनीषा पांडेचे आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय गीता यादव या महिलेच्या मनात होता. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत गीताने मनिषाचा काटा काढण्यासाठी तिला स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं. यावेळी गीताने घरी पुरी-भाजीचा बेत आखला होता. मनिषा एकीकडे पुरी तळण्याची तयारी करत असतानाच गीताने उकळतं तूप तिच्या अंगावर ओतलं.

मनिषा या घटनेत गंभीर जखमी झाली. तिच्या मान, पोट, छाती, चेहरा, पाठ आणि मांडीचा भाग गंभीररित्या भाजला होता. या घटनेनंतर मनिषाला तात्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतू परिस्थितीत सुधार न झाल्यामुळे मनिषाला मुंबईत सायन रुग्णालयात हलवण्यात आलं. ज्यानंतर ६ मार्च रोजी उपचारादरम्यान मनिषाचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या, तीन मित्रांना अटक

वर्तकनगर पोलिसांनी या घटनेत गीता यादव या महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपीला अटक झालेली नाहीये. पोलीस या घटनेचा तपास करत असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्याची प्रक्रीया लवकरच सुरु होईल असं ठाणे पोलिसांचे सहायक पोलीस उपायुक्त निलेश सोनावणे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

नागपुरात थरकाप उडवणारी घटना! बेपत्ता २३ वर्षीय तरुणीची जाळून हत्या

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT