Meena Kumari Death Anniversary: जेव्हा मीना कुमारीला सेटवर खाव्या लागलेल्या 31 कानाखाली
बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून मीना कुमारी यांना ओळखले जाते. त्यांनी वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 31 मार्च रोजी त्यांचा स्मृतिदिन असतो. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या क्वचितच लोकांना माहित आहेत.
ADVERTISEMENT
Meena Kumari: बॉलिवूडमध्ये (Bollywood) ट्रॅजेडी क्वीन म्हणून मीना कुमारी (Meena kumari) यांना ओळखले जाते. त्यांनी वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 31 मार्च रोजी त्यांचा स्मृतिदिन असतो. मीना कुमारींनी कमी वयात बॉलिवूडमध्ये आपलं मोठं स्थान निर्माण केलं होतं. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मनं जिंकली होती. त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक किस्से आजही खूप गाजलेले आहेत. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या क्वचितच लोकांना माहित आहेत. (meena kumari death anniversary know about her personal stories)
ADVERTISEMENT
मीना कुमारी नेहमी त्यांचा डावा हात ओढणीने झाकायच्या. तसेच, एकदा एका दिग्दर्शकाला धडा शिकवण्याच्या बदल्यात त्यांना 31 कानशीलात लगावण्यात आल्या होत्या.
नाशिक : काळाराम मंदिरात संयोगिता राजेंसोबत घडला धक्कादायक प्रकार
मीना कुमारींना कुणी दिलेल्या 31 कानशीलात?
मीना कुमारी यांच्याबाबत अनेक किस्से वाचायला आणि ऐकायला मिळत असतात. मीना कुमारी त्याकाळात आघडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. मीना यांना 31 कानशीलात लगावण्यात आलेल्याचं कारण फारच विचित्र होते. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दिग्दर्शकाने मीना कुमारी यांच्या रूममध्ये मोठा टेबल लावला आणि सर्वांनी एकत्र बसून जेवण करूयात असं सांगितलं. जेवण करताना तो निर्माता मीना कुमारी यांच्यासोबत गैरव्यवहार करू लागला. मीनाला हे वागणं आवडलं नाही, तिला खूप राग आला आणि तिने सर्वांसमोर त्या चित्रपट निर्मात्याला चापट मारली.
हे वाचलं का?
मीना यांनी कानशीलात लगावल्यानंतर दिग्दर्शक प्रचंड संतापला आणि त्याने मीना कुमारींचा बदला घेण्याचं ठरवलं. मनातल्या मनात त्याने राग धरला. त्यावेळी सर्वांसमोर एक रिहर्सल असल्याचे त्याने भासवून दिलं. मात्र नंतर, त्याने चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल केले आणि असे सीन अॅड केले ज्यामध्ये हिरो हिरोईनला कानाखाली वाजवतो. यावेळी दिग्दर्शकाने कोणती ना कोणती कारणं देत 31 टेक करायला लावले आणि या कारणामुळे मीना कुमारींना 31 कानशीलात बसल्या.
भाजप नेत्यांची महिलांबद्दलची विधान सावरकरांच्या विचारांमधून आलेली : प्रणिती शिंदे
मीना कुमारी डावा हात कोणत्या कारणामुळे लपवायच्या?
अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलं असेल की, मीना कुमारी नेहमी डावा हात ओढणीने झाकायच्या. पण त्या अशा का करायच्या याबद्दल तुम्हाला माहितीये का?
ADVERTISEMENT
गोव्यात डच तरुणीसोबत घडला भयंकर प्रसंग; रिसॉर्टमधील कर्मचारीच निघाला वासनांध
खरं तर, यामागचे कारण कार अपघात आहे. एकदा मीना कुमारी यांचा महाबळेश्वरहून मुंबईला कारमधून परतताना मोठा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे शूटिंग करताना त्या डावा हात लपवायच्या असे एका मुलाखतीतून उघड झाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT