भाजप नेत्यांची महिलांबद्दलची विधान सावरकरांच्या विचारांमधून आलेली : प्रणिती शिंदे

ADVERTISEMENT

Praniti Shinde strongly criticized the low-level statements made by BJP leaders against women.
Praniti Shinde strongly criticized the low-level statements made by BJP leaders against women.
social share
google news

पिंपरी-चिंचवड : सावरकरांनी विरोधकांच्या स्त्रियांकडे वेगळ्या पद्धतीने बघा, त्यांच्यावर अत्याचार करा, असं म्हंटलं आहे आणि हाच विचार खाली कार्यकर्त्यापर्यंत आला. त्यामुले वारंवार भाजप (BJP), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) महिलांबाबत वक्तव्य केली जातात, अशा शब्दात भाजप नेत्यांच्या महिलांबद्दलच्या वक्तव्यांवर काँग्रेस (Congress) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी टीका केली. त्या आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होत्या. (Congress MLA Praniti shinde criticized BJP and RSS on Women Statements)

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

प्रत्येक पक्षाची विचारसरणी असते. जशी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महात्मा गांधींची विचारसरणी पटत नव्हती तशी आम्हाला म्हणजे काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना वीस सावरकरांची विचारसरणी मान्य नाही. सावरकरांनी कधी काळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात लिहिलं आहे, ती त्यांची विचारसरणी होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्यात वादग्रस्त नसून तो विचारसरणीचा फरक आहे. त्याबाबत आदर केला पाहिजे. तसंच याबाबत आपण शिवसेना (UBT) पक्षाशी चर्चा करु, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

हेही वाचा : नाशिक : काळाराम मंदिरात संयोगिता राजेंसोबत घडला धक्कादायक प्रकार

भाजप नेत्यांकडून महिलांवर होत असलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्यांवर प्रणिती शिंदे यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही महिलांच्या विरोधात आहे. यावेळी त्यांनी थेट सावरकरांच्या पुस्तकाचा आधार घेत म्हणाल्या, सावरकरांनी विरोधकांच्या स्त्रियांकडे वेगळ्या पद्धतीने बघा, त्यांच्यावर अत्याचार करा, असं म्हंटलं आहे. हाच विचार खालच्या कार्यकर्त्यापर्यंत आला आणि महिलांबाबत वक्तव्य केली जातात, अगदी सोनिया गांधींवरही टीका केली जाते, महिलांना ऐक वस्तू म्हणून पाहणे ही त्यांची विचारसरणी आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. महाराष्ट्र हा असा आधी नव्हता,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : सोमय्यांच्या हाती 20 जणांची साक्ष; ‘जवाब दो’ म्हणत परबांना पुन्हा डिवचलं

संभाजीनगरमधील घटना भाजपची स्ट्रॅटेजी असल्याचा आरोपही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्या म्हणाल्या, जेव्हा त्यांना दिसतं की कौल सरकत चालला आहे, कौल काँग्रेसच्या बाजून जात आहे किंवा त्यांच्या विरोधात जात आहे, तेव्हा ते काहीतरी कांड करतात. म्हणून ठिकठिकाणी पेटवापेटवीचं राजकारण आणि जातीयवाद पसरवतात. देशातील जनतेला वेठीस धरुन निवडणूक कशी जिंकायची याकडे ते बघत असतात. पण, जनता आता याला बळी पडणार नाही. जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar : दंग्यामागे राज्य सरकार; संजय राऊतांचा गंभीर आरोप

काँग्रेसने पहिल्या महिला पंतप्रधान, पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या. तसंच महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्रीही काँग्रेसच देणार, अशा आशावाद प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला. काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने महिला मंत्री दिल्या. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे आज ठिक-ठिकाणी महिला महापौर, नरसेवक, नगराध्यक्ष दिसत आहेत.त्याचवेळी देशासाठीचं हे विधेयक मोदी सरकारने अडवून ठेवलं आहे. आता 8 वर्ष होतील पण अद्याप हे विधेयक आणलेलं नाही, अशी टीकाही आमदार शिंदे यांनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT