Sharad Pawar : ''त्यांची लायकी नाही, मी यादी दिली तर फिरणं मुश्कील होईल', पवारांचा मुंडेंना इशारा
Sharad Pawar Reply Dhananjay Munde : ''त्यांना (मुंडेंना) एक लहान कुटुंबातला, लहान समाजातला एक उद्योन्मुख तरूण दिसतो म्हणून त्याला हाताला धरून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती, हे सगळं माहिती असताना सुद्धा, पण आता ते माझ्यावर वैयक्तिक हल्ले करायला लागले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Reply Dhananjay Munde : राष्ट्रवादीच्या फुटींनतर आता लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शरद पवारांवर टीका करायला सुरूवात केली आहे. नुकतीच धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.या टीकेला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ''ज्यांचं नाव तुम्ही घेता, त्यांची लायकी नाही. मी जर यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल,असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) पलटवार केला. (sharad pawar reply dhananjay munde lok sabha election 2024 ajit pawar leader ncp politics)
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी लोकमतला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पवारांनी मुंडेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. या मुलाखतीत धनंजय मुंडेंचे नाव घेताच पवारांनी प्रश्न विचारण्यास नकार दिला.मात्र नंतर ते पुढे म्हणाले, ''ज्याचे नाव तुम्ही घेताय, त्याची लायकी नाही. त्यांना त्यांना कशा कशातून बाहेर काढलं याची जर यादी दिली तर त्यांना फिरण मुश्कील होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग यावर मी बोलू इच्छित नाही'', असे म्हणत शरद पवारांनी मुंडेंना इशारा दिला.
हे ही वाचा : "उज्ज्वल निकम यांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं"
शरद पवार पुढे म्हणाले, ''त्यांना (मुंडेंना) एक लहान कुटुंबातला, लहान समाजातला एक उद्योन्मुख तरूण दिसतो म्हणून त्याला हाताला धरून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती, हे सगळं माहिती असताना सुद्धा, पण आता ते माझ्यावर वैयक्तिक हल्ले करायला लागले. कुटुंबावर हल्ले करायला लागलेच, त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही. आज शेवटचा उल्लेख त्यांच्याबद्दलचा माझ्याकडून होईल, अशी संतापजनक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Sharad Pawar : मोदींच्या 'भटकती आत्मा'वरून पवार भडकले
दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरेंविषयी महाराष्ट्रात सहानुभूती असल्याचे छगन भूजबळ यांनी म्हटले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, बघूया उद्या मतदान आहे, त्यावेळेला काय आहे, ते आपल्याला कळेल. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.मी महाराष्ट्रात हिंडतोय आणि ज्या पद्धतीने सभांना प्रतिसाद मिळतोय, तो मला पक्ष वाढीच्या दृष्टीने आणि आम्ही घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत वाटतो, असे शरद पवार यांनी सांगितले.
धनंजय मुंडे काय म्हणाले होते?
''सुनेला परकी म्हणता, तुमच्या घरात देखील लेकी आहेत.एक निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जर सुनेला परकी म्हणत असाल तर एवढी वेळ वाईट कोणावर येऊ नये. तुम्ही इतकं निगरघट्ट कसे झाला की सूनेला परके म्हणू लागलात'', अशा शब्दात धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर टीका केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT