Sharad Pawar : मोदींच्या 'भटकती आत्मा'वरून पवार भडकले, म्हणाले, "हो आहे, पण..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar reply narendra modi on bhatkati atma pune sabha lok sabha election 2024
माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले आता माझ्याबद्दल काय बोलतात?
social share
google news

Sharad Pawar Reply Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यातील प्रचार सभेतून ''भटकती आत्मा राज्य अस्थिर करतंय', अशी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती. मोदींच्या या टीकेचा आता शरद पवारांनी समाचार घेतला आहे. ''होय मी भटकती आत्मा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी शंभर वेळा मी अस्वस्थ राहीन, असा पलटवार शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान मोदींवर  (Narendra Modi)  केला आहे. (sharad pawar reply narendra modi on bhatkati atma pune sabha lok sabha election 2024) 

शरद पवार पुण्यातील सभेत बोलत होते.यावेळी मोदींनी केलेल्या भटकती आत्माच्या टीकेवर त्यांनी भाष्य केले. ''होय मी भटकती आत्मा आहे.माझा आत्मा तडफडत फिरतोय. पण लोकांचं दु:ख बघून तो तडफडतोय, मला याची काही चिंता नाही'', असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : ठाकरे, पवारांबद्दल सहानुभूतीची लाट दिसतेय का? मोदी म्हणाले...

शरद पवार पुढे म्हणाले, ''माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले आता माझ्याबद्दल काय बोलतात? एक आत्मा भटकत आहे, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, असं मोदी म्हणाले होते. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही'', असे शरद पवारांनी यांनी म्हटले आहे.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

''पंतप्रधान काल म्हणाले ईडीचा एक टक्काही मी वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय'', असा टोला देखील शरद पवारांनी मोदींना लगावला. 

हे ही वाचा : ''माढा मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार''

राहुल गांधींच्या टीकेवर मोदींना सुनावलं

शरद पवार पुढे म्हणाले, राहुल गांधींवर टीका करतात. शहाबजादे क्या करेंगे? मोदींना काय तरी वाटायला हवं, राहुलच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटले आहेत. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची हत्या झाली. आधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात शहाबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलतायेत. खोट्या गोष्टी सांगतायत, चुकीच्या पद्धतीने टीका टिपण्णी करत असतील तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT