Maharashtra Lok Sabha : ठाकरे, पवारांबद्दल सहानुभूतीची लाट दिसतेय का? मोदी म्हणाले...

भागवत हिरेकर

PM Modi Latest News : महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट असल्याच्या मुद्द्यावर मोदींनी उत्तर दिले.

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४

point

शरद पवार, उद्धव ठाकरे सहानुभूती लाट?

point

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडले मत

PM Modi on Sharad Pawar and Uddhav Thackeray : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली असून, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना मोदींनी काका-पुतण्याचा उल्लेख करत पवारांवर निशाणा साधला. (What was PM Modi's answer to the question of whether there is a wave of sympathy for Sharad Pawar and Uddhav Thackeray in Maharashtra?)

न्यूज 18 वृत्तवाहिनीला पंतप्रधान मोदी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूतीची लाट दिसतेय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला मोदींनी काय उत्तर दिले वाचा...

या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, "ही गोष्ट खरी आहे की तिथे (महाराष्ट्र) आघाडीची सरकारे चालतात. विलासराव देशमुखांपासून आतापर्यंत... शरद पवारही जेव्हा मुख्यमंत्री बनले होते, तेही पुर्ण बहुमतासह बनू शकले नव्हते."

हेही वाचा >> वर्षा गायकवाड यांना अर्ज भरण्याआधी अश्रू अनावर

"दुसरं महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलेलं आहे की, खूप काळापासून पाच वर्षांपर्यंत कुणीही एकजण मुख्यमंत्री राहिलेला नाही. एकही व्यक्ती पाच वर्ष राहिला नाही. मोठ्या काळानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिले व्यक्ती होते, जे पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री राहिले. पूर्ण सरकार निष्कलंक राहिले. लोकांचं कल्याण करणारे सरकार राहिले."

हे वाचलं का?

    follow whatsapp