Lok Sabha Election 2024: मोदी म्हणाले 'भटकती आत्मा...' ठाकरे म्हणतात 'एक वखवखलेला आत्मा...', पुण्यात प्रचाराला धार
pm modi vs Uddhav Thackeray: पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांबबात केलेल्या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जाणून घ्या...
ADVERTISEMENT

pm modi vs Uddhav Thackeray: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पुण्यातील खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेते एकत्र आले होते. याच जाहीर सभेत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'एक वखवखलेला आत्मा' असं विधान करत थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली. सोमवारी (29 एप्रिल) मोदींनी भटकती आत्मा असं म्हणत पवारांवर टीकेची झोड उठवली होती. ज्याला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युतर दिलं आहे. (pm odi Says sandering soul thackeray says atma edge in pune)
'पुण्यातील सभेत उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिलं जोरदार प्रत्युत्तर...'
कोणत्या भाषेत तुम्ही बोलता आहात? तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगा.. अजूनही यांच्या मानगुटीवर जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाही. म्हणजे 10 वर्ष झाले मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात. चिमटे काढून बघा तुम्ही स्वत:ला.. की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होतात.. कारण आता तुमची खुर्ची जातेय.'
'यांची भाषा एवढी खाली आलीए.. मला असं वाटतं की, आज अजित पवार म्हणाले की, मी त्यांना पुढच्या सभेत विचारेन.. की, भटकती आत्मा बोललेत.. भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात.. पवार साहेबांना बोललात?'
'जशी भटकती आत्मा असते ना.. तसा एक वखवखलेला आत्मा सुद्धा असतो. वखवखला आत्मा कसा असतो माहितीए.. हा सगळीकडे जातो.. सगळं काय.. पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायेत.. मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वत:साठी लढतायेत.'.