Samruddhi: काँग्रेसच्या ट्विटचा भाजपला प्रचंड राग, ‘बिल्डरच्या गाडी’वरुन रंगला नवा वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Samruddhi Expressway: मुंबई: राज्यातील बहुप्रतिक्षित मुंबई-नागपूर समुद्धी महामार्गाच्या (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) पहिल्या टप्प्याचं लोकापर्ण 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. या सोहळ्याआधी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला. यावेळी देवेंद फडणवीसांनी स्वत:च गाडी चालवत मुख्यमंत्र्यांचं सारथ्य केलं. पण फडणवीसांनी समृद्धी महामार्गावरुन जी गाडी चालवली त्यावरुन सध्या बरंच राजकारण तापलं आहे. त्यातही काँग्रेसने (Congress) केलेल्या ट्विटमुळे भाजपला (BJP) प्रचंड राग आला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात सध्या कारवरुनच चांगलंच राजकीय ‘वॉर’ रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. (mercedes benz g350d car driven by dcm devendra fadnavis on samruddhi highway now there is a war between congress and bjp)

ADVERTISEMENT

नेमका वाद काय?

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा नागपूर ते शिर्डी असा आहे. हा पहिला टप्पा तब्बल 530 किलोमीटरचा आहे. ज्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. यामुळे या उद्घाटन सोहळ्यात कुठेही उणीव राहू नये यासाठी स्वत: फडणवीसांनी नागपूरपासून शिर्डीपर्यंत आलिशान मर्सिडीज गाडी चालवली. ज्यामध्ये त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील होते.

पण फडणवीस जी Mercedes-Benz G350d कार चालवत होते त्याच कारवरुन महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?’ असा बोचरा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसने जरी मर्सिडीज गाडीवरुन फडणवीस-शिंदेंवर टीका केली असली तरीही ही गाडी नेमकी कोणत्या बिल्डरची आहे याबाबत ट्विटरवर तरी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

CM एकनाथ शिंदेंच्या गाडीचं स्टेरिंग देवेंद्र फडणवीसांच्या हाती, समृद्धी महामार्गांवरील फोटो

ADVERTISEMENT

भाजपचं प्रत्युत्तर…

दुसरीकडे काँग्रेसचं हे ट्विट भाजपला चांगलंचं झोंबलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपने याबाबत तात्काळ ट्विट करत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भाजपने कारवरुनच काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

’65 वर्षात काँग्रेसला जमलं नाही, ते बीजेपी ने 7 वर्षात पूर्ण केलं. समृद्धी महामार्गावरील ट्रायल काँग्रेसला बघवली नाही. बिल्डरची गाडी वापरली म्हणत खोड काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या माहितीसाठी राहुल गांधीने जनतेला गंडवलेल्या सहारा ग्रुपची गाडी अनकेदा वापरली आहे.’ असं ट्विट करत भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र, या ट्विटमध्ये फडणवीस चालवत असलेली कार नेमकी कोणाची याबाबत भाजपने देखील काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

नागपूर-पुणे प्रवास आता होणार आठ तासांत! नितीन गडकरींची घोषणा, नवा मार्ग ‘समृद्धी’ला जोडणार

फडणवीसांचा समृद्धी महामार्गावरुन सुसाट प्रवास…

दरम्यान, एकीकडे भाजप-काँग्रेसमध्ये वाद रंगलेला असताना दुसरीकडे समृद्धी महामार्ग मात्र सध्या बराच चर्चेत आहे. कारण नागपूरहून शिर्डीला येण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना फक्त 5 तास लागले. त्यामुळे या महामार्गावरुन किती सुसाट प्रवास करता येऊ शकतो याचा आपल्याला अंदाज आलाच असेल.

देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावरुन जवळजवळ 150 किमी वेगाने मर्सिडीज कार पळवली. त्यामुळे त्यांनी नागपूरहून पाच तासातच शिर्डी गाठली. फडणवीस ज्या मर्सिडीज गाडीमधून प्रवास करत होते त्याची किंमत ही तब्बल 2 कोटी एवढी होती. ही कार अत्यंत आलिशान अशी असून त्यात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक विशिष्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळेच फडणवीस देखील बिनधास्तपणे ही कार पळवत होते. पण आता या कारमुळेच विरोधकांनी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT