‘तेव्हा’ नारायण राणे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापत होते : विनायक राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चिपळूण : शिवसेना स्थापन झाली, त्यावेळी उद्धव ठाकरे 6 वर्षांचे होते. पण त्यावेळी नारायण राणे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापत होते, हा दोघांमधला फरक आहे अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. ते बुधवारी चिपळूणमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी “शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते,” असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना खोचक टोला लगावला होता.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे तेव्हा 6 वर्षांचे होते. पण त्यावेळी नारायण राणे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापणे, कोंबड्यांच्या माना उडवणे, तिथल्या टॉकीजमध्ये ब्लॅक करणे अशी काम करत होते. उद्धवजींचे तसे नाही, 6 वर्षांच्या वयामध्ये उद्धवजींवर जे संस्कार झाले, ते नारायण राणेंवर आयुष्यात कधी होणार नाहीत, असाही टोला राऊत यांनी यावेळी लगावला.

कोकणातील शिवसेना अबाधित : विनायक राऊत

दरम्यान, कोकणातील मोठ्या प्रमाणात लोक शिंदे गटात गेलेली नाहीत. आदित्य ठाकरे यांचा जो कोकणात दौरा झाला, त्यावेळी शिवसेनेची जी शक्ती दिसली, त्यावरून दिसून येते कोकणातील शिवसेना आजही अबाधित आहे. 2 ते 3 नेते गेले म्हणजे जनता गेली असे कधी होत नाही, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा तुम्ही ६ वर्षाचे होते; नारायण राणे ठाकरेंना काय म्हणाले?

“शिवसेनेचा जन्म झाला १९ जून १९६६. तेव्हा फक्त तुम्ही ६ वर्षांचे होता. तेव्हापासून शिवसेना मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात तुम्ही कुठेही नव्हता. तुम्ही १९९९ साली आलात. मी मुख्यमंत्री झालो आणि त्यांना कुणीतरी सांगितलं की राणे मुख्यमंत्री झालेत, तू पण कार्यरत रहा. तू मुख्यमंत्री होशील. तोपर्यंत शिवसेनेत सक्रिय नव्हते. एव्हढी आंदोलनं झाली. शिवसैनिक मार खात होते. जेलमध्ये जात होते. हे कुठे होते? असे सवाल उद्धव ठाकरे यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणावर बोलताना राणे यांनी केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT