औरंगाबाद : खाऊचं आमिष दाखवत चिमुकलीवर अत्याचार, दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लहान अल्पवयीन मुलीला खाऊचं आमिष देत गच्चीवर नेऊन तिच्यावर शारिरिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मुलीने या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसांत याविषयी तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही मुलांना अटक केली असून ही मुलंही अल्पवयीन असल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी पीडित मुलगी आपल्या कॉलनीत खेळत होती. यावेळी शेजारील दोन मुलांनी तुला खाऊ देतो असं म्हणत मुलीला गच्चीवर नेलं. ही दोन्ही मुलं पीडित मुलीच्या शेजारीच राहणारी १३ आणि १० वर्षांची होती. गच्चीवर नेल्यानंतर या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. आपल्यासोबत काय घडलंय हे न कळाल्यामुळे मुलगी रडतच आईकडे आली. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तिने आईला घडलेल्या घटनेची माहिती दिली. हे ऐकल्यानंतर आईला धक्का बसला. रात्री पती घरी आल्यानंतर आईने आपल्या मुलीवर शेजारील दोघांनी अत्याचार केल्याचं सांगितलं.

महाराष्ट्र हादरला ! ५५ वर्षीय नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार

हे वाचलं का?

पीडित मुलीला पालकांनी डॉक्टरकडे नेऊन तिच्यावर उपचार केले. डॉक्टरांनी मुलीला धीर दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मनिषा साळुंखे यांच्या मदतीने पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या दोन्ही आरोपी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं, आईने आपल्याच मुलाची केली हत्या

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT