शिंदे-फडणवीसांचा रवी राणा-बच्चू कडूंना फोन?अमरावतीमधील संघर्ष थंडावण्याची चिन्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावती : भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा विरुद्ध शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातील संघर्ष थंडावण्याची चिन्ह आहेत. या दोन्ही आमदारांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन मध्यस्थी केल्याचं वृत्त ‘साम वृत्तवाहिनी’ने दिलं आहे. तसंच दिवाळीनंतर लवकरच या चौघांमध्ये बैठक होणार असल्याचही या वृत्तात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या दरम्यान मागील काही काळापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. हा वाद आता शिगेला पोहचला आहे. बच्चू कडू यांनी नाव न घेता रवी राणा यांच्यावर आरोप केले होते. जेव्हा मी निवडणूकचा अर्ज भरला तेव्हा आम्ही रक्तदान करून अर्ज भरतो. पण आधी खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.

तसंच जे इथं भाषण करतात सभागृहात काहीच करत नाहीत. ५० वर्षात अनेक आमदार गेले सभागृहात, पण किती जणांनी अपंग अनाथांसाठी आवाज उठवला? असा सवाल कडू यांनी केला होता. ताकाला जाऊन भांडं लपवायच हे आमचं काम नाही. कोणी कोणता झेंडा घेतला याचा संबंध नाही, आमचा झेंडा, अजेंडा हा सेवेचा झेंडा आहे, असे त्यांनी सांगितले होते.

हे वाचलं का?

या आरोपांवर बोलताना रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला आणि गुवाहाटीमध्ये जाऊन करोडोंचा व्यवहार केला, असा आरोप त्यांनी केला होता. शिंदे गटातील आमदारांवर बंडखोरीसाठी भाजपकडून ५० कोटी रुपये घेतल्याचे आरोप सातत्याने महाविकास आघाडीतील आमदार आणि नेत्यांकडून झाले आहेत. मात्र पहिल्यांदाच भाजप समर्थक आमदारकडून हे आरोप झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

यानंतर आमदार रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे दिले तर त्यांच्या घरी भांडी घासेन, असं प्रत्यूत्तर देत कडू यांनी थेट अमरावतीमधील राजापेठ पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. याची माहिती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पाेहचली.

ADVERTISEMENT

यानंतर दाेन्ही नेत्यांनी आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्याना फाेन केल्याचे समजते. दरम्यान, माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यामुळे ते जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करु, असं देखील राणा म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT